AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, विक्रीपूर्वी करा ‘ही प्रक्रिया’, शेतकऱ्यांना कृषीतज्ञांचा सल्ला

खरीपातील उडीद, मूग या पीकाची हमीभाव केंद्रावर खरेदी सुरु झाली आहे. आता सोयाबीनचीही ऑनलाईनद्वारे नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचीही खरेदी ही हमीभावाने होणार आहे. मात्र, हमीभाव केंद्रावर दर्जानुसार दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील माल थेट बाजारात न आणता त्यापुर्वी योग्य ती प्रक्रीया करणे आवश्यक आहे. नेमकी ती प्रक्रीया काय आहे ते आपण पाहणार आहोत...

...तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, विक्रीपूर्वी करा 'ही प्रक्रिया', शेतकऱ्यांना कृषीतज्ञांचा सल्ला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 6:18 PM

मुंबई : खरीपातील उडीद, मूग या पीकाची हमीभाव केंद्रावर (guarantee centre ) खरेदी सुरु झाली आहे. आता सोयाबीनचीही (Soyabean) ऑनलाईनद्वारे नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचीही खरेदी ही हमीभावाने होणार आहे. मात्र, हमीभाव केंद्रावर दर्जानुसार दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील माल थेट बाजारात न आणता त्यापुर्वी योग्य ती प्रक्रीया करणे आवश्यक आहे. नेमकी ती प्रक्रीया काय आहे ते आपण पाहणार आहोत…

सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. पावसामुळे सोयाबीनचा दर्जा हा ढासाळलेला आहे. यातच दर कमी असल्याने डागाळलेल्या सोयाबीनची कवडीमोल दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली शेतीमालाची विक्री न करता सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्यासाठी सोयाबीन ऊनामध्ये वाळवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोयाबीनमधील आर्द्रता कमी होणार असून चांगला दर मिळणार आहे. सध्या पावसामुळे सोयाबीनच्या पीकावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी योग्य दर पदरात पाडून घेण्यासाठी ही प्रक्रिया करणे महत्वाचे असल्याचे कृषी विभागाच्या वतीनेच सांगण्यात आलेले आहे.

मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजार समिती बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक विकास नरवाल बाजार समित्यांच्या सचिवांनाच योग्य त्या सुचना देऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यातील 259 बाजार समित्यांना याबाबत सुचना केल्या आहेत. आर्द्रतेचे प्रमाण 20 ते 22 टक्क्यांपर्यंत असल्याने योग्य दर मिळत नाहीत.

आर्द्रतेचे प्रमाण कसे मोजावे

यंदा सोयाबीन हे पाण्याच भिजल्याने नुकसान झाले आहे. हे पीक काळवंडले असून त्याचा दर्जाही ढासाळलेला आहे. त्यामुळे सोयाबीन वाळवून त्याच्यातील आर्द्रतेचे प्रमाण मोजणे आवश्यक आहे. हे प्रमाण मोजण्यासाठी बाजारात यंत्र मिळते. पावसात सोयाबीन भिजल्याने त्यामध्ये 22 ते 23 टक्के आर्द्रता म्हणजेच हवेचे प्रमाण. त्यामुळे सोयाबीनला दरही कमी मिळतो. ऊनात वाळवल्यानंतर त्याच्यातील आर्द्रता ही 10 ते 11 टक्क्यावर आली तर चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

11 हजारावरील सोयाबीन 5 हजारावर

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर हे 11 हजार रुपये क्विंटल होते. मात्र, सध्याची स्थिती बदलली आहे. सोयाबीन हे 5 हजार रुपये प्रमाणे विकले जात आहे. दर घसरले आहेत शिवाय मालाचा दर्जाही घसरलेला आहे. त्यामुळे योग्य मिळवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत कृषी विभागानेच मार्गदर्शन केले आहे.

सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण

यंदा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीनची विक्रमी लागवड झाली होती. त्यामुळे भरघोस उत्पादन होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने तर नुकसान झालेच शिवाय सरकारचे धोरणही चुकले त्यामुळे अधिकचा फटका बसलेला आहे. सोयापेंडच्या आयातीचा निर्णय, तेलबियांच्या साठ्यावर निर्बंध यामुळे साोयाबीनचे दर अधिकचे घसरले आहेत. यातच सुधारणा करण्याच्या अनुशंगाने कृषी विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. (Do this to get a good rate for soyabean; Advice of Agriculture Department to Farmers)

संबंधित बातम्या :

मंदिरे उघडली बाजार ‘फुलला’, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला

खरीप पीकांची मळणी सुरुयं..मग ही खबरदारी आवश्य घ्या…!

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.