AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पीएम किसान’ योजनेतील हे बदल माहिती आहेत का?… जाणून घ्या आवश्‍यक बाबी…

पीएम किसान सन्मान निधीच्या 2,000 रुपयांचा अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही तारखेला ही रक्कम सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवू शकते, असा अंदाज आहे

‘पीएम किसान’ योजनेतील हे बदल माहिती आहेत का?... जाणून घ्या आवश्‍यक बाबी...
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 1:56 PM

मुंबई : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना घेउन येत असतात. ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisans scheme) ही देखील यातीलच एक योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये या योजनेंतर्गत देण्यात येतात. केंद्र सरकार (Central Government) लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा 2000 रुपयांचा अकरावा हप्ता (Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

ई-केवायसी अवश्‍य करा

दरम्यान, योजनेची रक्कम पाठवण्यापूर्वी केंद्र सरकारने योजनेत काही मोठे बदल केले आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेंतर्गत 2000 रुपयांचा निधी मिळू शकणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, असे शेतकरी योजनेतील अकराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांना वाढीव मुदत देण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तारीख वाढवली आहे. नवीन माहितीनुसार, आता ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षीत आहे.

आता जाणून घ्या हप्त्यांची स्थिती

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी आपल्या सुविधांमध्येही बदल केला आहे. आता हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे. याशिवाय या योजनेसाठी शिधापत्रिका क्रमांक देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच शिधापत्रिकेची पीडीएफ प्रत तयार करून ती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. .

संबंधित बातम्या :

Fertilizer : खरिपाच्या तोंडावर खतांच्या किंमतीमध्ये वाढ, केंद्र सरकारचे धोरण काय?

Amravati : राज्यात ऊन-पावासाचा खेळ, पावसामुळे आंबा गळती तर ऊन्हामुळे मोसंबी होरपळली

Unseasonal Rain : उरली-सुरली आशाही मावळली, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा राहिली

टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.