शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ठिबक संच बसवला आता अुनदानही खात्यावर होणार जमा, लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात
पिकांना पाणी देताना पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच शेतकऱ्यांकडे कायम पाणीसाठा रहावा या उद्देशाने ठिबक सिंचन योजना ही राबवली जात आहे. यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा याकरिता तब्बल 80 टक्के अनुदान दिले जात आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरापासून संच घेतला आहे पण अनुदानाचा लाभच नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, आता केंद्राकडून निधी देण्याबाबत हलचाली ह्या सुरु झाल्या आहेत.
पुणे : पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच शेतकऱ्यांकडे कायम पाणीसाठा रहावा या उद्देशाने (Drip Irrigation) ठिबक सिंचन योजना ही राबवली जात आहे. यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा याकरिता तब्बल (Subsidy) 80 टक्के अनुदान दिले जात आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरापासून संच घेतला आहे पण अनुदानाचा लाभच नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, आता (Central Government) केंद्राकडून निधी देण्याबाबत हलचाली ह्या सुरु झाल्या आहेत. तब्बल 300 कोटी रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची शक्यता आता कृषी विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा मोकळा होणार असून लाखो शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. केंद्राकडून 200 कोटी आणि राज्याचा 100 कोटीचा हिस्सा असे 300 कोटी अनुदानाच्या स्वरुपात शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
गतवर्षात 1 लाख 33 हजार शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग
ठिबक सिचंनासाठी 80 टक्के अनुदान देऊ करुन या योजनेची अवस्था ही ‘मागेल त्याला शेततळे’याप्रमाणे झाली होती. शिवाय काळाच्या ओघात शेतकरी अत्याधुनिक प्रणालीचाच वापर करीत आहे. यापूर्वी ठिबकसाठी अनुदान हे 45 टक्के होते. मात्र गतवर्षी राज्य सरकारने यामध्ये वाढ करुन थेट 80 टक्के अनुदान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग हा दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी तब्बल 1 लाख 33 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर’महाडीबीटी’ पोर्टलवर बीलेही अपलोड केली होती. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे अनुदानाची रक्कम ही रखडली होती. केवळ 39 हजार 938 शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले होते. आता उशिर झाला तरी सर्व अनुदान एक रकमेत मिळावी अशी मागणी होत आहे.
केंद्राचा पहिला हप्ता लवकरच
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. स्थानिक पातळीवर जनजागृती झाल्याने शेतकऱ्यांचा सहभागही वाढत आहे. शिवाय पाणी बचतीचा सरकारचा उद्देशही साध्य होत आहे. योजनेत तत्परता असावी म्हणून महाडीबीटी च्या माध्यमातून सर्व प्रणाली पूर्ण केली जात आहे. आता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने केंद्राकडील पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
देर आऐ…दुरुस्त आऐ..शेतकऱ्यांना मिळणार वाढीव अनुदान
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील केंद्राच्या खर्चाचे मापदंड हे 10 ते 13 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिलणार आहे. हे केंद्राचे झाले तर दुसरीकडे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून देखील 200 कोटी अनुदान उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च उशिरा का होईना पदरी पडणार आहे.
संबंधित बातम्या :
काय आहे ‘गाव गोदाम योजना’..? ग्रामपंचायतींना उत्पन्न अन् शेतकऱ्यांना कसा होणार लाभ? वाचा सविस्तर