शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक, टॅक्टरही जळाला; महावितरणचा गलथान कारभार

राज्यभरात अशा घटना घडत असल्याने वारंवार महावितरण अधिका-यांंवर शेतकरी वर्गातून टीका करण्यात येते. परंतु त्यावर अद्याप महावितरणच्या अधिका-यांकडून उपाय योजना तयार झालेल्या नाहीत असं चित्र आहे.

शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक, टॅक्टरही जळाला; महावितरणचा गलथान कारभार
आगीत जळत असलेला टॅक्टर
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:53 AM

पुणे – पुण्यातील (pune) नारायण गावात (Narayangaon) महावितरणाचा गलथान कारभार पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे. अनेकदा शेतक-यांचं आलेलं उभं पीक जळाल्याचं आपण पाहिलं आहे. अशा घटना अपघाताने घडत असतात. परंतु त्यावर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात किंवा त्यावर उपाय काढण्यात महावितरण पुन्हा एकदा अपयशी ठरलं आहे. नारायण गावात काल अचानक कळमजाई मळ्याला अचानक आग लागली. तिथं वस्तीवर कोणीही नसल्यामुळे तिथला दहा ते बारा एकरांचा ऊस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतीच्या कामासाठी वापरा जाणारा अमित रोहिदास भोर यांचा ट्रॅक्टर (tractor) सुध्दा जळाला आहे. घटना घडली तेव्हा तिथं कोणीही नसल्याने आग लागल्याची बातमी तात्काळ लोकांना समजली नाही.

आगीच्या भक्ष्यस्थानी या शेतक-यांचा ऊस 

आगीच्या झालेल्या घटनेमध्ये अनेक शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला आहे. अर्जुन भोर, विठ्ठल भोर, विष्णु भोर, इंदुबाई कुरकुटे, हनुमान खंडागळे आणि बारकु भोर या शेतक-यांचा ऊस जळाला आहे. महाविरणाचा गलथान कारभार वारंवार उघडकीस येत आहे. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आत्तापर्यंत राज्यात शॉर्टसर्किटमुळं अनेक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे. तसेच ऊस जळालेल्या शेतक-यांनी सुध्दा भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

दोन दिवसात ऊस तोडणार असल्याचं आश्वासन

आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी युवक अध्यक्ष सुरज वाजगे, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सदस्य मयुर विटे, निलेश दळवी, तुषार टेमकर, अनिकेत भोर, राजेश भोर, अविनाश भोर यांच्यासह स्थानिक शेतकर्‍यांनी भेट देत पाहणी करुन शेतकर्‍यांना मदत मिळण्याची मागणी केली आहे. तसेच चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी तात्काळ कारखान्याचे खोडद गटप्रमुख रमेश जाधव, फिल्डमन पवन गाढवे यांना घटनास्थळी पाठवुन पाहणी करुन दोन दिवसात जळालेल्या उसाची तोडणी करणार असल्याचे सांगितले.

महावितरणाचा गलथान कारभार 

राज्यभरात अशा घटना घडत असल्याने वारंवार महावितरण अधिका-यांंवर शेतकरी वर्गातून टीका करण्यात येते. परंतु त्यावर अद्याप महावितरणच्या अधिका-यांकडून उपाय योजना तयार झालेल्या नाहीत असं चित्र आहे. त्यामुळे असं शेतक-यांचं पीक किती दिवस जळत राहणार हे सुध्दा आपल्याला पाहावं लागेल.

Onion Market: सोलापुरात कशामुळे होतेय रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक? लासलगावही पिछाडीवर

Banana : केळीची आवक घटूनही दर स्थिरावलेलेच, केव्हा बदलणार चित्र?

नांदेड : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 238 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप; उर्वरित निधी 15 दिवसांच्या आत मिळणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.