दोडक्याच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न, पण ‘या’ पध्दतीचा करावा लागणार अवलंब

काळाच्या ओघात जेवढे उत्पादन हे मुख्य पिकांतून घेतले जाते त्यापेक्षा अधिकचे हे भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना मिळते. शिवाय या भाजी पिकांचा कालावधीही मर्यादित असतो. त्यामुळे मुख्य पिकाबरोबर आता भाजीपाल्याची लागवड ही केली जातेच. त्यापैकीच एक असलेल्या दोडक्याची लागवड ही जर वैज्ञानिक पध्दतीने केली तर चांगले उत्पादन मिळणार आहे.

दोडक्याच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न, पण 'या' पध्दतीचा करावा लागणार अवलंब
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 2:26 PM

मुंबई : भाजीपाल्यातून अनेक शेतकरी हे अगदी काही महिन्यांमध्ये लाखो रुपये कमवतात. मात्र, त्यापेक्षाही अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही होते. केवळ माहितीचा आभाव आणि चुकीच्या पध्दतीचा अवलंब यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय वेळ आणि शेती क्षेत्राचा योग्य वापरही होत नाही. काळाच्या ओघात जेवढे उत्पादन हे मुख्य पिकांतून घेतले जाते त्यापेक्षा अधिकचे हे भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना मिळते. शिवाय या भाजी पिकांचा कालावधीही मर्यादित असतो. त्यामुळे मुख्य पिकाबरोबर आता भाजीपाल्याची लागवड ही केली जातेच.

त्यापैकीच एक असलेल्या दोडक्याची लागवड ही जर वैज्ञानिक पध्दतीने केली तर चांगले उत्पादन मिळणार आहे. दोडक्याची लागवड ही संपूर्ण देशात होते मात्र, महाराष्ट्रात याचे प्रमाण हे अधिकेचे आहे. राज्यात 1147 हेक्टरावर दोडक्याची सरासरी लागवड ही केली जाते. ही एक वेलभाजीपाला असून खेड्यांपासून ते शहरांपर्यंत याची मागणी आहे. गरज आहे ती योग्य पध्दतीने लागवड करुन उत्पादन वाढविण्याची त्याचीच माहिती आपण घेणार आहोत

लागवडीसाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत?

दोडका हे पिक पावसाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही हंगामात घेता येते. शिवाय थंड हवामानात याची उत्तम वाढ होते. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणीपुरवठा केला तर उत्पादनात वाढ होणार आहे. अधिकतर लागवड ही लोम मृदाक्षेत्र असलेल्या भागात लागवड केली जाते.

दोडक्याची वैशिष्टे

दोडका लागवडीमध्ये पुसा नासदार या वाणाची अधिकच्या प्रमाणात लागवड केली जाते. हे पिक लांब आणि हिरव्या रंगाचे असते. लागवडीपासून केवळ दोन महिन्यांमध्ये म्हणजेच 60 दिवसांमध्ये हे तोडणीलायक होते. शिवाय याच्या एका वेलाला 15 ते 20 फळे लागतात. याच्या तोडणीचा बहर हा ठरलेला असतो. म्हणजे 3 ते 4 वेळेस याची तोडणी होते. शक्यतो वेलीच्या या भाजीपाल्याची उत्पादकता वाढवण्यासाठी वेल केला जातो. त्यानुसार त्याची वाढ तर होतेच पण दोडक्याची खराबी होत नाही.

खते आणि पाण्याचा योग्य वापर

दोडक्याच्या दरम्यानच 20 किलो ‘एन’ हे 30 किलो ‘पी’ या रासायनिक खतांचा डोस प्रति हेक्टर द्यावा लागणार आहे. त्यामुळे पिकाची वाढ जोमात होते शिवाय भाजीपाला हे अल्पावधीचे पीक असल्याने याला रोगराईचा प्रादुर्भाव झाला तर अधिकच्या नुकसानीचा धोका असतो तो या खतापासून कमी होतो. पीक फुल लागवडीच्या दरम्यानही 20 किलो ‘एन’चा दुसरा डोस घाला. तसेच लागवडीच्या वेळी 20 ते 30 किलो प्रति हेक्टर, 25 किलो ‘पी’ आणि 25 ते 30 किलो एनचा दुसरा डोस महिन्याच्या कालावधीने द्यावा लागणार आहे.

वेलीच्या अनावरणाचा फायदा

दोडका हे वेलभाजी पिक आहे. त्यामुळे त्याची वाढ सुरु झाली की, त्याला आधाराची आवश्यकता असते. त्यामुळे वाळलेला बांबू किंवा झाडाच्या फांद्याचाही वापर केला जातो. शिवाय आता तर तारेचे वेलही कायमस्वरुपासाठी वापरले जात आहेत. त्यामुळे एकतर यामध्ये तणाचा धोका राहत नाही. शिवाय वाढही जोमान होऊन उत्पादकता वाढते.

रोगापासून संरक्षण करण्यासाठी उपाय

दोडका पिकांवर प्रामुख्याने केवाडा आणि तपकिरी रोगांचा परिणाम होतो. तपकिरी रोगावर नियंत्रणासाठी डिनोकॅप-1 मिली. केवाडा नियंत्रित करण्यासाठी डायथिन झेड 78 हे एक हेक्टरमध्ये पाण्यात मिसळून फवारल्यास त्याचा फायदा होणार आहे. (Earn lakhs from vegetable cultivation, ridge gourd farming)

संबंधित बातम्या :

गोष्ट पडद्यामागची : राज्य सरकारचा मदतनिधी बॅंकेत, खात्यावर येण्यास का होतोय विलंब ?

फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान, लागवडीपासून काढणीपर्यंतची काय आहे प्रक्रिया?

‘पांढऱ्या सोन्या’च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.