नुकासान भरपाई दूरच, शेतकरी-अधिकारी सुसंवाद नसल्याने सावळा गोंधळ, शेतकऱ्यांच्या बांधावर वेगळेच चित्र

सद्य:स्थितीला शेतशिवारात पावसाचे पाणी हे साचलेले आहे. शिवाय पावसाची रिपरीप असतानाही विमा भरलेली कागदपत्रे, बॅंक पासबुक घेऊन शेतकरी चिखलात आपलीच पिके तुडवत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी धडपडत आहे. ना महसूलचे ना कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य शेतकऱ्याला मिळत आहे.

नुकासान भरपाई दूरच, शेतकरी-अधिकारी सुसंवाद नसल्याने सावळा गोंधळ, शेतकऱ्यांच्या बांधावर वेगळेच चित्र
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 9:23 AM

औरंगाबाद : पावसाने खरिपाचे नु्कसान झाले हे त्रिकालबादित सत्य असले तरी हे झालेले नुकसान प्रशासनाच्या आणि विमा कंपनीच्या निदर्शनास आणुन देण्यात शेतकऱ्यांचे मात्र, कंबरडे मोडत आहे. सद्य:स्थितीला शेतशिवारात पावसाचे पाणी हे साचलेले आहे. शिवाय पावसाची रिपरीप असतानाही विमा भरलेली कागदपत्रे, बॅंक पासबुक घेऊन शेतकरी चिखलात आपलीच पिके तुडवत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी धडपडत आहे. ना महसूलचे ना कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य शेतकऱ्याला मिळत आहे. अतिवृष्टीने सर्व खरिप हंगामच पाण्यात आहे. खरिपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे या सालचे आर्थिक गणितच कोलमडणार आहे. शिवाय या प्रतिकूल परिस्थितीतूनही पिक पदरात पडले तरी दर काय मिळणार याबबत साशंकाच आहे. नुकसानभरपाई पदरात पाडून घेण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यकच आहे. याकरिता वेगवेगळे सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर असले तरी ई-पिक नोंदणीची पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने ऑफलाईन पध्दतीलाच पसंती देत आहेत.

मात्र, शेतकऱ्याचे गऱ्हाने ऐकून घेण्यास ना कृषी अधिकाऱ्यांना वेळ आहे ना महसूलच्या अधिकाऱ्यांना रस नाही. यातच सलग सुट्ट्या  असल्याने अनेक अधिकाऱ्यांचे मोबाईल हे बंदच आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई दूरच पण याकरिता आवश्यक असलेली नुकसानीची नोंद होणार की नाही याबाबतच शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

काय चित्र आहे गावशिवारात ?

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अॅपद्वारे तक्रार नोंदिवण्याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे ज्या तरुणाला याचे ज्ञान अवगत आहे त्या तरुणाकडून अॅपद्वारे माहिती भरुण नुकसानभरपाईसाठी पात्र होण्यास शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. याकरिता हातचे काम सोडू या प्रक्रियेतच शेतकऱ्यांना दिवस वाया घालावा लागत आहे.

महसूल- कृषी विभागाची टोलवाटोलवी

शेतकऱ्यांना ऑनलाईद्वारे तक्रार नोदवण्यास आली नाही तर मंडळ अधिकारी किंवा महसूलच्या तलाठी यांच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. मात्र, हे काम कृषी विभागाचेच आहे. त्यामुळे महसूलचे अधिकारी हस्तक्षेप करीत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

या सहा पध्दतीने नोंदवता येणार तक्रार

1) शेतकऱ्यांना ‘क्रॅप इंन्शुरन्स अॅप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्व:ता भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

2) विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.

3) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.

4) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.

5) पिक विमा कंपनीचा ro.mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.

6) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे. Farmer and Officers are not dialogue for compensation, different picture on the farmers’ dam

संबंधित इतर बातम्या :

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास मुदतवाढ, शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदवण्याचं शासनाचं आवाहन

वर्षाला 25 हजार रुपये गुंतवून मत्स्यशेतीचा व्यवसाय सुरु करा, सरकारकडून अनुदान, महिन्याला 2 लाखांची कमाई

सरसकट पीकविमा मंजूर करा, पंचनाम्यासाठी वेळ घालवू नका, नांदेडच्या खासदारांची ठाकरे सरकारकडं मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.