…अखेर ज्याची भीती होती तेच झाले, ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळात पिक विम्याचे पैसे अडकले

पिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आतमध्ये विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकरी हे ऑनलाईन दावे करु शकलेले नव्हते. मात्र, आता त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा प्रत्यय सोमवारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे.

...अखेर ज्याची भीती होती तेच झाले, ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळात पिक विम्याचे पैसे अडकले
नुकसानभरपाई न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला होता
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 5:04 PM

उस्मानाबाद : पिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आतमध्ये विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकरी हे ऑनलाईन दावे करु शकलेले नव्हते. मात्र, आता त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा प्रत्यय सोमवारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे. विमा रक्कमच जमा झाली नसल्याने जवळपास 300 ते 400 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या दिला होता. गेल्या तीन दिवसांपासून नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा न झाल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारी

खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांची माहिती ही ऑनलाईनद्वारे ते ही 72 तासाच्या आतमध्ये करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ही सुविधा नव्हती शिवाय याबाबत अधिकची माहितीही नव्हती. त्यामुळे ऑनलाईन तक्रारी शेतकरी करु शकलेले नाहीत. असे असताना ज्यांनी ऑफलाईन पिक विम्याचे अर्ज केले आहेत. त्यांना देखील नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तीन दिवसानंतरही नुकसानभरपाई ही जमा झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला होता.

विमा अदा करुनही भरपाई नाही, दुहेरी संकट

यंदा पावसामुळे खरिपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळेल या आशेपोटी विमा हप्ता हा कंपनीकडे जमा केला होता. मात्र, आता नुकसानभरपाई तर नाहीच पण विमा हप्त्यापोटी भरलेले पैसेही नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. केवळ ऑनलाईनचे कारण सांगून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई टाळता येणार नाही. त्यामुळे योग्य ती भूमिका घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

बाहेर ठिय्या, दालनात बैठका

पीक विम्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर 300 ते 400 शेतकरी एकवटले होते. शेतकरी आपल्या समस्या मांडत होते तर जिल्हाधिकारी हे अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेण्यात व्यस्त होते. वेळोवेळी कर्मचारी दालनाबाहेर येऊन शांत बसण्याचे अवाहन करीत होते तर शेतकरी आपल्या मागण्या लावून धरीत होते. आता नुकसानभरपाई रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे ज्यांना विमा रक्कम मिळाली नाही असे शेतकरी हे संतप्त होणार असून त्यांना कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीकडे तक्रार करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

उशिराचे शहाणपण : 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, उर्वरीत रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

Special News | सोयाबीन अन् सोयापेंड, नेमकं नातं काय ?

सोयाबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, शेतकऱ्यांच्या मनात नेमंक आहे तरी काय?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.