Special News : ‘लिंकिंग’ खतविक्रीला कुणाचे ‘खतपाणी’, वावरामध्ये निसर्गाचा लहरीपणा अन् बाजारात लूट

खरीप हंगामात विशिष्ट खतालाच अधिकची मागणी असते. जशी आता युरियाला आहे. युरियाची एक बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 270 रुपये मोजावे लागतात. पण एवढ्यावरच विषय मिटत नाही तर युरियाबरोबर शेतकऱ्याला गरज असो अथवा नसो इतर एका 150 रुपयांपर्यंतच्या लिक्विड खताची खरेदी ही करावीच लागते याला लिंकिंग पध्दत म्हणतात.

Special News : 'लिंकिंग' खतविक्रीला कुणाचे 'खतपाणी', वावरामध्ये निसर्गाचा लहरीपणा अन् बाजारात लूट
लिंकिंगपध्दतीला खत विक्रतेच त्रस्त आहेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:42 PM

भंडारा : मध्यंतरीच्या अवकाळी संकटानंतर आता पुन्हा अन्नदाता चोही बाजूने संकटात सापडला आहे. (Agricultural Prices) शेतीमालाच्या दरात कायम घसरण सुरु आहे. पावसाने दडी मारल्याने खरिपाबाबत चिंतेचे ढग आहेत हे कमी म्हणून की काय खत वावरात टाकण्यापूर्वीच लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. आणि यामध्ये आरोपीच्या कठड्यात उभे आहेत ते कृषी सेवा केंद्र चालक. मात्र, या लिकिंगनुसार खतविक्रीला (Fertilizer) खत कंपन्याचे जबाबदार असल्याचे समोर येत आहे. युरियाच्या खताबरोबर इतर खताचे पोते विकत घेण्याची अट कृषी केंद्र चालक घालत असले तरी हा नियमच खत कंपन्यांनी घालून दिला आहे. त्यामुळे पडद्यामागे कोणी दडलंय हे (Agricultural Department) कृषी विभागाला माहिती असून बळी ठरत आहेत ते कृषी सेवा चालक. केंद्र चालकाच्या मदतीने खत कंपन्या लूट करीत असल्या तरी राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कृषी केंद्रावर कारवाईचा धडाका सुरु आहे. मात्र, असली गुन्हेगार समोर येतील का मोठा प्रश्न आहे.

काय आहे लिंकिंग पध्दत?

खरीप हंगामात विशिष्ट खतालाच अधिकची मागणी असते. जशी आता युरियाला आहे. युरियाची एक बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 270 रुपये मोजावे लागतात. पण एवढ्यावरच विषय मिटत नाही तर युरियाबरोबर शेतकऱ्याला गरज असो अथवा नसो इतर एका 150 रुपयांपर्यंतच्या लिक्विड खताची खरेदी ही करावीच लागते याला लिंकिंग पध्दत म्हणतात. जसे नाव आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लूटण्याचीही लिंक लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट तर होत आहे पण याबाबत आवाजही उठविता येत नाही अशी अवस्था झाली आहे.

लिंकिंगचे गणित लाखोंमध्ये

भंडारा जिल्ह्यामध्ये या आठवड्यात कोरोमंडळ इंटरनॅशनल कंपनीने दोन रॅक खत आणले आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खत 100 बॅग पाहिजे असल्यास त्यासोबत 20:20:00:13 या ग्रेडचे खत घेणे बंधनकारक केले होते. म्हणजेच 1 लाख 34 हजार डीएपी खतासोबत 5 लक्ष 75 हजार रुपयांचे जादा खत खरेदी शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. या शिवाय 200 बॅग युरिया सोबत ३०० किलो “सुल्फामक्स” हे दुय्यम मागणी नसलेले खत घेणे बंधनकारक केले आहे. 200 बॅग युरिया खतांची किंमत 51 हजार होत असून त्यासोबत 31 हजार रुपयांचे दुय्यम खतदिले जाते. जर कृषी केंद्र चालकांनी याचा विरोध केले तर त्यांना कुठलेही खत दिले जात नाही.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागाचा वेळकाढूपणा

कृषी केंद्रावरील कारवाईत धन्यता मानणाऱ्या कृषी विभागाला पडद्यामागे काय आहे ? याची माहिती आहे. पण खत कंपन्यांबरोबर बैठका घेऊन हा विषय मार्गी लावला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी अशा प्रकार खत खरेदी केली आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खत कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. आणि कारवाई बाबत कृषी विभाग उदासिन असल्याने याचे प्रमाण वाढत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.