Beed : शेतकऱ्यांच्या पोरांचा नादच खुळा, आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी लावले सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे, आमरण उपोषणची जिल्हाभर चर्चा
माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि नित्रुड येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हा परिषद समोर शेतकऱ्यांची मुलं आमरण उपोषनाला बसले आहेत.गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु असून याबाबत अद्याप कसलीच कारवाई झाली नाही याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढार्यांचे मुखवटे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
बीड : सरळ मार्गाने न्याय मिळत नसेल तर कोण, कधी काय करेल याचा नियम नाही. आता माजलगाव तालुक्यातील दोन गावच्या (Grampanchayat) ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावच्या (Farmer Child) शेतकऱ्यांच्या मुलांनी केला आहे. एवढेच नाही तर कारवाईसाठी या मुलांनी जिल्हा परिषदेसमोर 4 दिवसांपासून आमरण उपोषणही सुरु केले आहे. एवढे करुनही उपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने या मुलांनी थेट सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे घालून आंदोलनाला सुरवात केली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यापासून ते (Beed) बीड मधील स्थानिक आमदार यांचा मुखवटा देखील या उपोषणकर्त्यांनी घा्तला होता. उपोषणाकडे लक्ष दिले जात नसल्याने त्यांना केलेल्या या अनोख्या पध्दतीमुळे हे आमरण उपोषण आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. असे करुनही मागण्या मान्य होतात की नाही हे पहावे लागणार आहे.
नेमके प्रकरण काय ?
माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि नित्रुड येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हा परिषद समोर शेतकऱ्यांची मुलं आमरण उपोषनाला बसले आहेत.गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु असून याबाबत अद्याप कसलीच कारवाई झाली नाही याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढार्यांचे मुखवटे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
मुखवट्यावर ‘ही’ राजकीय मंडळी
गेल्या चार दिवसांपासून लोणगाव आणि नित्रुड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी या 2 गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनी केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या पोरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांचे मुखवटे परिधान केले होते. या अनोख्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात एकच चर्चा झाली आहे. जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे