Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले

खुल्या बाजारपेठेपेक्षा हमीभाव खरेदी केंद्रावर अधिकचा दर असूनही शेतकरी हे केंद्राकडे पाठ फिरवत होते. राज्यात 1 मार्चपासून हमीभाव खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत नोंदणी आणि शेतीमालाची काढणी याच कामात शेतकरी व्यस्त होता. अखेर केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी होण्यास सुरवात झाली आहे तर त्याचा परिणाम थेट आता बाजारसमितीमधील शेतीमालाच्या आवकवर झालेला पाहवयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीचे धोरण स्वीकारले असल्यानेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 हजार पोत्यांची आवक झाली आहे.

Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 3:44 PM

लातूर : खुल्या बाजारपेठेपेक्षा (Guarantee Rate) हमीभाव खरेदी केंद्रावर अधिकचा दर असूनही शेतकरी हे केंद्राकडे पाठ फिरवत होते. राज्यात 1 मार्चपासून (Chickpea Crop) हरभरा हमीभाव खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत नोंदणी आणि शेतीमालाची काढणी याच कामात शेतकरी व्यस्त होता. अखेर केंद्रावर शेतकऱ्यांची (Farmer Registration) नोंदणी होण्यास सुरवात झाली आहे तर त्याचा परिणाम थेट आता बाजार समितीमधील शेतीमालाच्या आवकवर झालेला पाहवयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीचे धोरण स्वीकारले असल्यानेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 हजार पोत्यांची आवक झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून 40 ते 45 पोत्यांची आवक होत होती. हमीभाव केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये तब्बल 600 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे केंद्रावरील अटी-नियम मान्य करुन शेतकरी आता खरेदी केंद्रच जवळ करणार असेच शनिवारच्या आवकवरुन समोर येत आहे.

अधिकच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात तर वाढ झालेली आहेच. शिवाय पोषक वातावरणामुळे अधिकचे उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची हीच वेळ असून हरभऱ्याबरोबर गहू आणि इतर कडधान्यही जोमात आहेत. यंदा वाढत्या उत्पादकतेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता खरेदी केंद्रावरील आवक वाढल्यानंतर खुल्या बाजारपेठेतील दर वाढतील असे चित्र आहे. मात्र, शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सरासरी 4 हजार 600 चा दर मिळाला आहे. तर 45 हजार पोत्यांवरील आवक थेट 25 हजारांवर येऊन ठेपलेली आहे.

सोयाबीनचे दरही अन् आवकही स्थिरच

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वर स्थिर झाले आहेत. गतआठवड्यात चढ-उतार झाल्यानंतर या आठवड्याच्या सुरवातीपासूनच दर हे स्थिर राहिलेले आहेत. याचा परिणाम आवक झाला असून वाढलेली आवक पुन्हा 18 हजार पोत्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असतानाच दर हे स्थिर राहलेले आहेत.आता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काय होणार हे पहावे लागणार आहे.

तुरीच्या आवकमध्ये मात्र वाढ

तुरीचेही खरेदी केंद्र राज्यभर सुरु आहेत पण, खरेदी केंद्रापेक्षा बाजारात तुरीला 300 रुपये अधिकचा दर आहे शिवाय रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळत असल्याने बाजार समितीमध्येच विक्री केली जात आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 26 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. तर दर हा 6 हजार 600 रुपये एवढा आहे.

संबंधित बातम्या :

Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन

Drone Farming : शेत शिवारात पोहचलं ड्रोन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण अन् काय आहे जिल्हा परिषदेचे धोरण?

Agricultural Pump : विद्युत पुरवठ्याचा कालावधी ठरला आता वीज तोडणी मोहीम बंद करण्यासाठी आंदोलन

Non Stop LIVE Update
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.