पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागाही उध्वस्त, नुकसानभरपाईच्या मागणीचा जोर
सबंध राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली तर पंढरपूर तालुक्यातही अवकाळीने अवकृपा दाखविल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोलापूर : सबंध राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे मात्र, (western Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील (Damage to crops) पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली तर पंढरपूर तालुक्यातही अवकाळीने अवकृपा दाखविल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले असल्याने द्राक्षाचे घड हे कुजत आहेत.
वर्षभरापासून जोपासलेल्या द्राक्ष फळबागांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नुकसान होत आहे तर नुकताच पेरा झालेल्या रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुशंगाने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात पण निसर्गाची अवकृपा सातत्याने होत असल्याने पदरी निराशाच पडत आहे.
सातारामध्ये स्ट्रॅाबेरीचे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी
यापूर्वीही झालेल्या पावसामुळे ज्वारी ,हरभरा ,कांदा ,गहु या पिकांच मोठ नुकसान झालं असुन कोरोना काळात आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी या पावसाने मात्र उधवस्त केला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुका, जावली तालुका महाबळेश्वर ,पाचगणी, सातारा तालुका आणि कोरेगाव तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. तर महाबळेश्वर आणि पाचगणी येथे स्ट्रॅाबेरीचे उत्पादन घेतले जाते. उत्पन्न वाढीच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्ची करुन शेतकरी हे धाडस करतात पण आता काढणीच्या दरम्यानच पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. पिक पाहणी आणि पंचनामे करुन नुकसानभरपाईची मागणी बागायतदार शेतकरी करु लागले आहेत.
द्राक्षाच्या उत्पादनात होणार घट, पावसाने न भरुन निघणारे नुकसान
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्षबागांना बसलेला आहे. कारण पंढरपूरसह नाशिकमध्ये द्राक्ष काढणीला अवघ्या आठ दिवसांनीच सुरवात होणार होती. मात्र, वातारणातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. तर द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता याचे व्यवस्थापन केले तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही. एकरी 50 हजार रुपये खर्ची करुन पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागांची जोपासना केली होती. शिवाय अधिकचे उत्पन्न मिळावे म्हणून तालुक्यात द्राक्ष बागाचे क्षेत्र हे वाढत आहे. पण निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
फळबागासह रब्बी हंगामही धोक्यात
समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बी हंगाम मोठ्या जोमात बहरेल असे चित्र होते. शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही मिटली होती. पण आता पावसाच्या नुकसानीचे ग्रहन शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. अतिवृष्टीने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तूर या पिकांचे नुकसान झाले तर आता अवकाळीमुळे हरभरा, गहू या मुख्य पिकांवर किडीचा प्रादुर्भावर वाढत आहे. बुरशीनाशक व किडनाशक मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पिक जोपसण्यातच होत असलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता केवळ पंचनामे करुन नुकसानभरपाईची मागणी राज्यातील शेतकरी करीत आहे.