Thane: माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध करणारी घटना! गरोदर असलेल्या जखमी गाईचं संवेदनशील कुटुंबाकडून बाळंतपण

असे म्हटले जाते की काळाच्या ओघात कुठे राहिली आहे माणुसकी, शिवाय तशा घटनाही घडत आहेत. पण आम्ही तुम्हाला अशा एका घटनेचे दर्शन घडवून देणार आहोत ज्यामुळे माणुसकीवरील विश्वास अधिकच दृढ होईल. ही घटना ठाणे जिल्ह्यातील असली तरी प्रत्येकाच्या मनाला भावनारी आहे. ही कहाणी आहे जखमी अवस्थेतील गाभण गाय आणि तिच्या बाळंपणासाठी खटाटोप केलेल्या तेलम कुटुंबियांची...शहापूर तालुक्यातील विहिगावच्या ढवळी गायीने शनिवारी एका गोंडस वासराला जन्म दिला आहे.

Thane: माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध करणारी घटना! गरोदर असलेल्या जखमी गाईचं संवेदनशील कुटुंबाकडून बाळंतपण
जखमी गायीच्या बाळंतपणासाठी शेतकरी कुटुंबानी घेतलेली काळजी ही माणुसकीचे दर्शन घडवून देणारी आहे.
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 12:58 PM

ठाणे : असे म्हटले जाते की, काळाच्या ओघात कुठे राहिली आहे माणुसकी… शिवाय तशा घटनाही घडत आहेत. पण आम्ही तुम्हाला अशा एका घटनेचे दर्शन घडवून देणार आहोत ज्यामुळे (Humanity) माणुसकीवरील विश्वास अधिकच दृढ होईल. ही घटना (Thane) ठाणे जिल्ह्यातील असली तरी प्रत्येकाच्या मनाला भावनारी आहे. ही कहाणी आहे जखमी अवस्थेतील गाभण (Cow) गाय आणि तिच्या बाळंपणासाठी खटाटोप केलेल्या तेलम कुटुंबियांची…शहापूर तालुक्यातील विहिगावच्या ढवळी गायीने शनिवारी एका गोंडस वासराला जन्म दिला आहे. मात्र, तत्पूर्वीच्या तिच्या वेदना आणि तेलम दांम्पत्यांनी तिचे बाळंतपण व्यवस्थित पार पाडण्यासाठी घेतलेले परिश्रम काय आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत…

नेमकी घटना काय ?

शहापूर गावच्या विहिगावातील तेलम दांम्पत्य हे ढवळी गाईचा सांभाळ करीत आहे. ढवळी 9 महिन्याची गाभण असतानाच शेत शिवारतल्या एका खड्ड्यात पडली. गाभण असताना अशी घटना झाली की, गाईला किंवा पोटातल्या वासराच्या जीवाला धोका असतो. पण घटना घडताच तेलम यांनी आपल्या ढवळीला बैलगाडीत टाकले आणि या दाम्पत्यांनी बैलगाडी ओढत ढवळीला निवाऱ्याला आणले. गेल्या आठ दिवसांपासून हे दोघे ढवळी गाईच्या तब्येतेची काळजी घेत होते. एखाद्या मुक्या जनावराला जीव लावला की ते पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचा सांभाळ करतात याचाच प्रत्यय या तेलम दांम्पत्याकडे पाहिल्यावर येतो. सलग आठ दिवस जागेवर पाणी, चारा याची जागेवर पूर्तता या दोघांनी केली आहे.

अन् ढवळीच्या पोटी गोकुळी जन्मली…

तेलम दांम्पत्याची मेहनत आणि मुक्या जनावराविषयी त्यांची आत्मयिता याचे फलीत शनिवारी मिळाले. आठ दिवसांपासून एका जागी बसून असलेल्या ढवळीने शनिवारी सकाळी एका गोंडस वासराला (गाईला) जन्म दिला. त्या कालवडीचे नाव गोकुळी असे ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर ढवळीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे तर गोकुळीची तब्येत ही उत्तम आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या मदतीने प्रसुती

ढवळी गायीची अवस्था पाहून सोमनाथ तेलम यांनी वैद्यकीय कर्मचारी चौधरी यांना बोलावून घेतले. शनिवारी सकाळी डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. जयश्री दळवी यांनी जखमी ढवळीची प्रसुती केली. ढवळी पडल्यापासून तिचे माकडहाड मोडले आहे. गेल्या सात दिवसापासून एकाच ठिकाणी ती बसून होती त्यामुळे प्रसुतीदरम्यान डॉक्टरांना बोलावणे महत्वाचे होते असे सोमनाथ तेलम यांनी सांगितले. जन्मलेल्या कालवडीचे नाव हे गोकुळी असे ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Weather Update : राज्यात ऊन-पावसाचा खेळ, आणखी पाच दिवस धोक्याचेच…! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Sugarcane : निर्यातीमुळे वाढला साखरेचा ‘गोडवा’ साखर उद्योगांना ‘अच्छे दिन’

Kharif Season : खरिपातील सोयाबीन बियाणाची चिंता मिटली, उन्हाळी बिजोत्पादन मात्र संकटात

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...