Beed : असा हा विरोधाभास, एकीकडे गळ्याला फास तर दुसरीकडे आनंदाला उधाण, कहाणी अतिरिक्त उसाची

हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी उसाची तोड होते की नाही या धास्तीने गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव या 35 वर्षीय शेतकऱ्याने दीड एकरातील उसाचा फड पेटवून स्वत: गळपास घेऊन जीवन संपवले होते. वाढता कर्जाचा बोजा आणि ओढावलेल्या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले तर दुसरी याच तालुक्यातील मारफळा इथले रविराज कुटे या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने नेला त्याचा आनंद गगणात मावेना झाला होता.

Beed : असा हा विरोधाभास, एकीकडे गळ्याला फास तर दुसरीकडे आनंदाला उधाण, कहाणी अतिरिक्त उसाची
अतिरिक्त उसामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली तर दुसरीकडे उसाचे गाळप झाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करताना शेतकरीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 5:46 PM

बीड :  (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गहन आहे याची प्रचिती बीड जिल्ह्यातील दोन घटनांवरुन समोर येऊ लागली आहे. अतिरिक्त उसाचे गाळप न झाल्यामुळे गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील तरुण शेतकऱ्याने आगोदर उसाच्या फडाला आग लावली व नंतर (Farmer Suicide) गळ्याला फास. तर दुसरीकडे याच अतिरिक्त उसाला कारखान्याची तोड मिळाल्याने मारफळा इथले शेतकरी बेभाण होऊन आनंदोत्सव साजरा करीत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांचा प्रश्न एकच होता पण परिणाम काय याचे दर्शन सबंध राज्याला घडले आहे. या दोन्हीही घटना गेवराई तालुक्यातीलच असून यामध्ये रखडलेले (Sugarcane Sludge) उसाचे गाळप आणि कारखान्याची तोड फडात आल्यावर काय होते याचा प्रत्यय आला आहे.

अतिरिक्त ऊसाच्या धास्तीने शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यात सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न मराठवाड्यात निर्माण झाला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी उसाची तोड होते की नाही या धास्तीने गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव या 35 वर्षीय शेतकऱ्याने दीड एकरातील उसाचा फड पेटवून स्वत: गळपास घेऊन जीवन संपवले होते. वाढता कर्जाचा बोजा आणि ओढावलेल्या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले तर दुसरी याच तालुक्यातील मारफळा इथले रविराज कुटे या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने नेला त्याचा आनंद गगणात मावेना झाला होता. याच आनंदाच्या भरात अख्ख्या गावाने ऊसभरणी केलेल्या ट्रॅक्टर समोर ढोल-ताश्याच्या गजरात ठेका धरला होता. त्यामुळे अतिरिक्त उसाने निर्माण केलेल्या दोन घटनांची चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे.

मारफळ येथे ऊसाच्या ट्रॉलीची जंगी मिरवणूक

चार दिवसापूर्वीच नामदेव जाधव या शेतकऱ्याने स्वतःचा ऊस पेटवून देऊन गळफास घेत आत्महत्या केली होती. दरम्यान गेवराई तालुक्यातील मारफळा इथले रविराज कुटे या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने नेला याच आनंदाच्या भरात शेतकरी कुटे यांनी गावातच ऊसाच्या ट्रॉलीची जंगी मिरवणूक काढत बँड बाजा आणि गाण्याच्या तालावर ठेका धरला. एका शेतकऱ्याने तर आनंदाच्या भरात चक्क साडी परिधान करून गाण्याच्या तालावर थिरकायला सुरुवात केली. त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी नृत्यावर ठेका धरला, गुलालाची उधळण बँड बाजा आणि गाण्यावर ताल धरत शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने उसाची पाठवणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्यातच अतिरिक्त उसप्रश्न पेटला

अतिरिक्त ऊसामुळे नामदेव जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने वेळेत ऊसतोड झाली नाही म्हणून ऊसाचा फड पेटवून दिला होता. मे महिना अंतिम असतानाही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मराठावड्यातील बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊस अजूनही फडातच आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.