PM KISAN YOJNA : अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा, तरच मिळणार पीएम किसान निधी योजनेचा 10 हप्ता
काळाच्या ओघात योजनेमध्ये अनियमितता होत असल्याचे समोर आल्यानेच आता कडक नियमवाली जारी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता e- KYC पूर्ण करावी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत. आता 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान 10 व्या हप्त्याची 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा होणार आहेत.
मुंबई : देशातील शेतकऱ्यांचा योग्य सन्माान व्हावा या अनुशंगाने (PM Kisan Sanman Yojna) पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी (Farmer) शेतकऱ्यांच्या खत्यावर 6 हजार रुपये जमा केले जातात. मात्र, काळाच्या ओघात योजनेमध्ये अनियमितता होत असल्याचे समोर आल्यानेच आता कडक ( Scheme Rules) नियमवाली जारी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता e- KYC पूर्ण करावी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत. आता 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान 10 व्या हप्त्याची 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा होणार आहेत. त्यापूर्वी e-KYC पूर्ण करणे गरजेचे आहे.
असे करा घरबसल्या e-KYC
e-KYC करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. याकरीता सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला वेगवेळे टॅब दिसतील यामध्ये सर्वात वरती eKYC असं लिहलेले दिसेल. यावर क्लिक करायचे आहे. यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर मात्र, लगतच दिलेला इमेज कोड टाकून सर्च बटनावर क्लिक करायचे आहे. यानुसार तुमचा e-KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. गेल्या 5 वर्षापासून या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये जे नागरिक या योजनेसाठी पात्र नाहीत असेही लाभ घेत असल्याचे निदर्शनास येताच नियमांची अंमबजावणी केली जात आहे. तर ज्यांनी कागदपत्रांचा गैरवापर करुन योजनेचा लाभ घेतला अशा नागरिकांकडून पैसे वसुल केले जात आहेत.
आतापर्यंत 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यंत देशातील 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. गतवर्षीही 25 डिसेंबर रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा झाली होती. त्यामुळे यंदाही नेमक्या कोणत्या दिवशी रक्कम अदा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता या संदर्भातले काम अंतिम टप्प्यात आहे. दहाव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकरी यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.