AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे म्हणून. याकरिता एक महिन्याचा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. आता कर्जमुक्ती होणार म्हणल्यावर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हे आधार प्रमाणीकरण करण्याची घाईगडबड सुरु झाली आहे. पण आधार प्रमाणीकरण करायचे म्हणजे काय ? याची माहिती आपण घेणार आहोत..

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 10:53 AM

लातूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती यादीत (Debt relief list) नाव असूनही अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेली आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अवाहन केले जात आहे की, त्या संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे म्हणून. (Aadhaar Card Authentication) याकरिता एक महिन्याचा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. आता कर्जमुक्ती होणार म्हणल्यावर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हे आधार प्रमाणीकरण करण्याची घाईगडबड सुरु झाली आहे. पण आधार प्रमाणीकरण करायचे म्हणजे काय ? याची माहिती आपण घेणार आहोत..

शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2021 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सुरु करण्यात आली होती. मात्र, कधी राज्य सरकारकडे पैशाचा तुटवडा असल्याने शेतकरी हे वंचित राहिले होते तर आता शेतकऱ्यांनी आधार हे प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण केले तरच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्यांनी वेळेत ही प्रक्रीया पूर्ण करणे महत्वाचे आहे.

काय आहे आधार प्रमाणीकरण?

* कोणत्याही शासकीय कामामध्ये आधार कार्ड हे आता आवश्यकच झाले आहे. आता कर्जमुक्तीसाठीही हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक झाले आहे. प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे. * अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असूनही त्याची दुरुस्ती ही केली जात नाही. त्याची आवश्यकताही वाटत नाही. पण जर तुमचे नाव कर्जमुक्ती यादीत आले आहे पण कर्जमुक्ती झाली नाही तर तुम्हाला ही प्रक्रीया करावीच लागणार आहे. * आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला आधार केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील त्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. यामध्य बदह करण्यासाठी तुमच्याकडे त्या बदलासंदर्भातले प्रूफ असणे आवश्यक आहे. याकरिता मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे. * यापुर्वी आधार कार्डवर केवळ संबंधित व्यक्तीचे जन्माचे वर्षाचा उल्लेख केला जात होता. पण आता तारीख, महिना यासह उल्लेख अनिवार्य झाला आहे. अशा दुरुस्त्या शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हव्यात. * प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल क्रमांक, जन्माचा दाखला, पॅन ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. * या प्रमाणीकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बॅंकेमध्येही हे बदल करुन घेता येतात.

महिन्याभराची मोहीम

आधार कार्ड हे प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाने कालावधी हा ठरवून दिलेला आहे. 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना हे प्रमाणीकरण करायचे आहे. यामुळे कारभरात नियमितता येणार आहे. याकरिता गावागावाद जनजागृती केली जात असून ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले नाही त्यांची यादी ही ग्रामपंचायत, शाळेचा परिसर या ठिकाणी लटकवली जाणार आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी प्रमाणीकरण आवश्यक आहे आणि शेवटची संधी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Farmers to get debt relief benefits only if Aadhaar authentication is done, important news for farmers)

संबंधित बातम्या :

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

दुष्काळात तेरावा : रब्बीच्या तोंडावर वाढले खतांचे दर, शेतकरी दुहेरी संकटात

शेतात जाण्यास रस्ताच नाही ? मग असा करा अर्ज अन् मिळवा हक्काचा रस्ता

विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.