एक नाही…दोन नाही…शेतकऱ्यांकडे सहा पर्याय, कृषी आयुक्तालयाकडून दिलासा

खरिपातील पिकांना पावसाचा फटका बसल्यानंतर बळाराजा हवालदिल झाला होता. यातच झालेल्या (Crop Dameged) नुकसानीची तक्रार दाखल करायची कशी असा पेचही निर्माण झाला.

एक नाही...दोन नाही...शेतकऱ्यांकडे सहा पर्याय, कृषी आयुक्तालयाकडून दिलासा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 10:24 AM

औरंगाबाद : खरिपातील पिकांना पावसाचा फटका बसल्यानंतर बळाराजा हवालदिल झाला होता. यातच झालेल्या (Crop Dameged) नुकसानीची तक्रार दाखल करायची कशी असा पेचही निर्माण झाला. शिवाय दिवसागणिस नियामवलीत बदल होत असल्याने संभ्रम अवस्थेतील शेतकऱ्यांना आता ( Agriculture Commissionerate ) कृषी आयुक्तालयाकडूनच दिलासा मिळाला आहे. नु्कसानीची तक्रार नोंदिवण्यासाठी आता वेगवेगळे सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहेत.

खरिप हंगामातील पिके ही शेवटच्या टप्प्यात असताना मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीनंतर पेच होता तो झालेल्या नुकसानीची पिक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवायची कशी? सुरवातीस केवळ ऑनलाईनद्वारेच तक्रार नोंदण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवर नुकसानीसंदर्भातील सर्व माहिती ही अॅपद्वारे भरणे शक्य नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा ऑफलाईनही तक्रार नोंदिवता येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांची होणारी गर्दी आणि तारांबळ पाहता आता कृषी आयु्क्तालयानेच वेगवेगळे सहा पर्याय दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. चला तर मग पाहू काय आहेत ते सहा पर्याय.

1) शेतकऱ्यांना ‘क्रॅप इंन्शुरन्स अॅप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्व:ता भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

2) विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.

3) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.

4) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.

5) पिक विमा कंपनीचा ro.mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.

6) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

या परिस्थितीमाध्ये उपयोगी पडणार हे पर्याय

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, शेत जमिन जलमय झाल्यास तसेच गारपीट, ढगफुटी शिवाय वीज कोसळून लागलेली आग या प्रसंगी शेतकऱ्यांना या सहा पर्यांयांचा उपयोग होणार आहे.

या आहेत आवश्यक बाबी..

नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला याबाबतची सुचना देणे आवश्यक आहे. याकरिता वरील सहाही पर्याय हे खुले असणार आहे. नेमून दिलेल्या वेळेत तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीलाही योग्य ती कारवाई करता येणार आहे. farmers-to-have-six-options-to-report-crop-loss-relief-from-agriculture-commissionerate

संबंधित इतर बातम्या :

पीक विमा कंपन्यांचे सर्व्हर बंद, नुकसानाचे फोटो कसे पाठवायचे, महसूल विभागानं वाऱ्यावर सोडलं, नांदेडचे शेतकरी आक्रमक

नांदेडमध्ये झेंडूच्या फुलबागा बहरल्या.. शेतकऱ्यांना चांगल्या दराची प्रतीक्षा

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला विक्रमी दर, हिंगोलीच्या शेतकऱ्याची चांदी

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.