Cotton : कापसाचे उत्पादन ‘रामभरोसे’च, अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणेचा नेमका फायदा काय?
कापूस उत्पादनात भारत देश हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. असे असतानाही योग्य त्या सुविधा उत्पादकांना पुरवल्या जात नाहीत. आता उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला तर त्याचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण त्यानुसारच बाजारपेठेचा मागणीचा अंदाज बांधता येणार आहे. मात्र, उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने दरातील चढ-उतार याबाबत शेतकऱ्यांना माहिती होणार नाही. शेतकऱ्यांना कोणता अंदाजच बांधता येत नसल्याने विक्री की साठवणूक हा निर्णय घेता येत नाही.
पुणे : (Cotton Production) कापूस उत्पादनात भारत देश हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. असे असतानाही योग्य त्या सुविधा उत्पादकांना पुरवल्या जात नाहीत. आता (Estimate of production) उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला तर त्याचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण त्यानुसारच बाजारपेठेचा मागणीचा अंदाज बांधता येणार आहे. मात्र, उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने दरातील (Cotton Rate) चढ-उतार याबाबत शेतकऱ्यांना माहिती होणार नाही. शेतकऱ्यांना कोणता अंदाजच बांधता येत नसल्याने विक्री की साठवणूक हा निर्णय घेता येत नाही. यंदा उत्पादन घटूनही त्याची माहिती सर्वच शेतकऱ्यांना होती असे नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात तर काहींनी विक्रमी दरात कापसाची विक्री केली आहे. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या बाबींची तरी पूर्तता होणे गरजेचे आहे.
अंदाज वर्तवणे का आहे महत्वाचे ?
केंद्र सरकारच्या अख्यारित असणाऱ्या समितीकडून कापसाच्या लागवडीवरुन यंदा कापसाचे उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो. त्यानुसार यंदा 362 लाख गाठींचे उत्पादन होईल असे सांगण्यात आले होते. अतिवृष्टीने नुकसान होऊनही सरासरी एवढे उत्पादन होईल असा अंदाज केंद्राने नेमलेल्या समितीनेच व्यक्त केल्याने हंगामाच्या सुरवातीला कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यात आले. त्यामुळे हंगमाच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली त्यांचे दुपटीने नुकसान झाले आहे. कारण आता हंगामाच्या सुरवातीला जो दर होता त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
सुधारित अंदाज व्यक्त न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
उत्पादनाचे क्षेत्र समोर आले की त्यानुसार उत्पादकता ठरवली जाते. शिवाय वेगवेगळ्या टप्प्यावर ही उत्पादकता अवलंबून असते. कापूस काढणीच्या अंतिम टप्प्यात बोंडअळी आणि बोंडसडचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळेही उत्पादनात घट झाली होती. त्यामुळेच दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली आहे. पण ही उत्पादकता केंद्राने स्थापीत केलेल्या कंपनीने जर जाहीर केली असती तर शेतकऱी सावध राहिला असता. अधिकचा दर मिळाला तरच विक्री हे धोरण अजून अधिकच्या काळासाठी अवलंबले असते.
आता केवळ 5 टक्के कापूस शिल्लक, आता व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’
आता कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांकडे केवळ 5 टक्के कापूस शिल्लक राहिला आहे. तर दुसरीकडे फरदडचे उत्पादन घेतले जात आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 7 ते 8 हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केली आणि आता दर 13 हजार 500 वर पोहचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे. हेच जर सक्षम उत्पादकता ठरवण्यात आली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. त्यामुळे केंद्राने नेमलेल्या समितीचा कारभारही संशयाच्या विळख्यात आहे.
संबंधित बातम्या :
Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास
Photo Gallery : उन्हाच्या झळा अन् पीक काढणीची लगबग, शेतशिवारातलं नेमकं चित्र काय?