शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात
अवकाळी आणि बरेच काही होऊन पिकांचे, फळबागांचे नुकसान सुरुच होते. मात्र, शेतकरी हा मदतीच्या प्रतिक्षेतच होता. याच दरम्यान, महाबळेश्वर येथे नुकसानभरापईचे काम नाम फांऊडेशने हाती घेतले आहे. या परिसरातील 105 गावातील शेतकऱ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.
सातारा : शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याला जोडूनच मदतीच्या घोषणा आणि आश्वासने येतातच. मग त्याची पूर्तता होऊ अथवा न होऊ. असाच प्रकार खरीप हंगामात झाला होता. (Heavy rains) अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच शिवाय (damage to agricultural land) शेत जमिनीही खरडून गेल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी झाल्या होत्या. त्यानुसार मदतीचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर अवकाळी आणि बरेच काही होऊन पिकांचे, फळबागांचे नुकसान सुरुच होते. मात्र, शेतकरी हा मदतीच्या प्रतिक्षेतच होता. याच दरम्यान, महाबळेश्वर येथे नुकसानभरापईचे काम (naam foundation) नाम फांऊडेशने हाती घेतले आहे. या परिसरातील 105 गावातील शेतकऱ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.
नेमके काय होणार काम?
मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील माती, दगड हे शेतजमिनीवर साचून राहिलेली होती. त्यामुळे शेत जमिन ही नापिक झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान टाळण्यासाठी आता नाम फांऊडेशने भूमिका घेतली आहे. 2 पोकलॅंड आणि 6 जेसीबीच्या माध्यमातून हे शेत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे आता शेतजमिन ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन हंगामापासून होणारे नुकसान टळणार आहे. सुरवातीला नदी-ओढ्यांचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पाऊस झाला तरी शेतजमिनीचे अधिकचे नुकसान न होण्यासाठी आगोदर हे काम हाती घेण्यात आले आहे.
पीक नुकसानभरपाई मिळाली शेतजमिनीचे काय?
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम अदा केली होती. पैकी 25 टक्के नुकसानभरपाई देणे अद्यापही बाकी आहे. एवढेच नाही खरडून गेलेल्या जमिन दुरुस्तीसाठीही निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, अद्यापही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे.
नाम फांऊडेशनच्या मदतीचे असे आहे स्वरुप
आतापर्यंत नाम फांऊडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कायम या फांऊडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. आता महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये शेतजमिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी झाला असून प्रथम जलसाठ्यांचे दुरुस्ती आणि नंतर शेतजमिनीची बांधणी केली जाणार आहे.