Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

ठिबक, स्प्रिंक्लर हा त्यामधलाच एक भाग आहे. पण आता फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती अच्छादन (Plastic Mulching Paper) रहावे जेणेकरुन पाण्यचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास तर टाळता येतोच शिवाय किड-रोगराईपासूनही पिकाचे संरक्षण होते. अलिकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे.

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा 'असा' घ्या लाभ...!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 5:01 PM

लातूर : शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. (Change in farming system ) अत्याधुनिक पध्दतीचा वापर करुन केवळ उत्पादनवाढीसाठीच नाही तर त्यासाठी आवश्यक बाबींचाही विचार सरकारकडून केला जात आहे. ठिबक, स्प्रिंक्लर हा त्यामधलाच एक भाग आहे. पण आता फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती अच्छादन (Plastic Mulching Paper) रहावे जेणेकरुन पाण्यचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास तर टाळता येतोच शिवाय किड-रोगराईपासूनही पिकाचे संरक्षण होते. अलिकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होत आहे. शिवाय (natural disaster) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळत आहे. विशेष: भाजीपाल्यासाठी याचा वापर वाढत आहे. वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांना याची खरेदी योग्य दरात करता यावी म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात आहे.

केंद्र आणि राज्यसरकारच्या वतीने विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. शिवाय त्याबद्दल अधिकची माहिती नसते. त्यामुळेच प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी असलेल्या 50 टक्के अनुदानाचा लाभ कसा घ्यावयाचा याची काय वैशिष्टे आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.

प्लास्टिक मल्चिंगसाठी कसे आहे अनुदान

या पेपरच्या वापरामुळे पिकांमध्ये तण वापले जात नाही. शिवाय किड-रोगराईचा प्रादुर्भावही होत नाही. सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी वापरासाठी 32000 रुपये खर्च येत असून या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत या खर्चाच्या 50 टक्के जास्तीत-जास्त रुपये म्हणजेच 16000 प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते. तर डोंगराळ भागासाठी खर्च हा 36800 ठरवून याच्या 50 टक्के रक्कम ही अदा केली जाते. यामध्ये शेतकरी वैयक्तिक लाभ घेऊ शकतो तसेच शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते.

ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे

ऑनलाईनसाठी सर्वप्रथम (https://mahadbtmahait.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणीसाठी 7/12, 8अ, आधार कार्डची झेरॅाक्स, आधार कार्ड हे बॅंकेशी संलग्न असल्याच्या पासबुकची झेरॅाक्स असणे आवश्यक आहे.

पिकांप्रमाणे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा असा करा वापर

3-4 महिने कालावधी असलेल्या पिकासाठी 25 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर गरजेचा आहे. यामध्ये भाजीपाला,स्ट्रॉबेरी यासरख्या पिकांना संरक्षण देता येते. तर मध्यम कालावधी म्हणजे 11 ते 12 महिन्यांच्या फळपिकांसाठी 50 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर उपयोगी ठरणार आहे. तर त्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या पिकांसाठी 100/200 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर घेतला तर अधिकचे फायद्याचे राहणार आहे.

असा करा पाठपुरावा

शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर मल्चिंग फिल्म खरेदी करावी. अनुदानाची रक्कम ही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा होते. (Government scheme; Take advantage of the importance of plastic mulching and the ‘such’ of 50% subsidy)

संबंधित बातम्या :

कडधान्यसाठा मर्यादेची मुदत संपली आता काय? सराकरचा उद्देश साध्य झाला का?

बाजार समिती बंद, तरीही 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक अन् अडीच कोटींचे व्यवहार

शेतकऱ्यांना आता महावितरणचा ‘शॅाक’, कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.