Jalna : सरकारची आत्महत्यामुक्तीची घोषणा, मराठवाड्यात मात्र आत्महत्या सत्र सुरुच, जालन्यात शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याकडेही फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. शिवाय फायनान्सचा व्याजदरही अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही दिवसेंदिवस वाढत होती तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची शाश्वती नाही. त्यामुळे या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Jalna : सरकारची आत्महत्यामुक्तीची घोषणा, मराठवाड्यात मात्र आत्महत्या सत्र सुरुच, जालन्यात शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन
वाढत्या कर्जाला त्रासून जालन्यातील शेकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:15 PM

जालना :  (State Government) शिंदे सरकारची स्थापना होताच महाराष्ट्र हे (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य असणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, राज्यात आत्महत्येचे सत्र हे सुरुच आहे. विशेष म्हणजे कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे. मराठवाड्यात नांदेडपाठोपाठ शनिवारी जालन्यात आत्महत्याची घटना घडली आहे. (Debt on farmers ) कर्जबाजारीपणाला कंटाळून अंबड तालुक्यातील वडी काळ्या गावातील पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या दाम्पत्याकडे फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. सध्याची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर याला त्रासून या दांम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतला. वडी काळ्या गावातील या शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले आहे.

पती-पत्नीची आत्महत्या

वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याकडेही फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. शिवाय फायनान्सचा व्याजदरही अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही दिवसेंदिवस वाढत होती तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची शाश्वती नाही. त्यामुळे या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. राहत्या घरी शनिवारी सकाळी गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले आहे. एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कर्जाचा वाढता डोंगर

पीक पद्धतीमध्ये बदल आणि उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीकोनातून शेतकरी कर्ज घेऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा उद्देश साध्य होईलच असे नाही. गतवर्षी परतीच्या पावसाने नुकसान झाले होते तर यंदा हंगामाच्या सुरवातीलाच अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत असल्याने वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतला होता.

पोलिसांत मात्र आकस्मात मृत्यूची नोंद

अंबड तालुक्यातील वडी काळ्या या गावातील पती पत्नीने राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या शेतकरी दाम्पत्याकडे फायनान्ससह वेगवेगळ्या बचत गटाचेही कर्ज होते. मात्र, घेतलेले कर्ज फेडायचे कसे यामधून त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात मात्र, आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.