AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : लवकरच जमा होणार किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता, 1.58 लाख कोटींची तरतूद

वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देऊन केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचा सन्मान करीत आहे. (PM kisan sanman nidhi Yojna) आता जमा होणारा हप्ता हा 10 वा असून त्याची रक्कम देखील (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर लदकरच जमा होणार आहे. जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची आनंदवार्ता मिळू शकते.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : लवकरच जमा होणार किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता, 1.58 लाख कोटींची तरतूद
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:21 PM

मुंबई : वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देऊन केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचा सन्मान करीत आहे. (PM kisan sanman nidhi Yojna) आता जमा होणारा हप्ता हा 10 वा असून त्याची रक्कम देखील (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर लदकरच जमा होणार आहे. जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची आनंदवार्ता मिळू शकते. सरकारने (PM) पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जाहीर करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्या अनुशंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या रकमेचा आधार मिळू शकतो.

आतापर्यंत या योजनेतून केंद्राने देशातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबर 2021 पर्यंत जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी सरकारने शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले. चार महिन्यातून एकदा ही रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरीत केली जाते.

नोंदणी करा अन् शेवटच्या राहिलेल्या हप्त्याचीही रक्कम मिळवा

पंतप्रधान किसान योजनेचा शेवटचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्यांनी पुढील हप्त्यासह आगोदरची रक्कमही मिळणार आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 हजार रुपये जमा होणार आहेत. याकरिता नोंदणीची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर आहे. याकरिता केवळ पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला, तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये आणखी एक 2000 चा आणि डिसेंबरमध्ये 2000 चा हप्ता मिळणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले

पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात. सरकार हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन हस्तांतरित करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल, तर काळजी करण्याची गरज नाही. आपले नाव पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये देखील नोंदवू शकता जेणेकरून सरकारच्या योजनेचा फायदा घेऊ शकता.

पात्र शेतकरी अशी नोंदणी करू शकतात

तुम्हाला प्रथम PM Kisan यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. येथे आपल्याला ‘Farmers Corner’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ‘New Farmer Registration’हा पर्याय निवडायचा आहे यामध्ये आधार क्रमांक नंबर भरणे आवश्यक आहे. त्यानंतर स्क्रीनवरील कॅप्चा कोड भरून राज्याची निवड करावी लागणार आहे आणि मग पुढील प्रक्रिया पहावी लागणार आहे. यामध्ये आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते आणि शेताची माहिती यांचा तपशील भरावा लागतो. (Happy News for Farmers: 10 instalments of Kisan Samman Yojana to be collected soon, rs 1.58 lakh crore provision)

इतर बातम्या :

‘भारत बंद’ला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा, बंदमध्ये सामील व्हा; जयंत पाटील यांचं आवाहन

Maharashtra School Reopen: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मान्यता, ‘या’ दिवशी शाळा सुरु

तुळजाभवानीच्या दारातच भाविकांची लूट, भाविकांनी दान केलेल्या हजारो रुपयांवर डल्ला!

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.