वादळ, वारा, अवकाळी अंगावर झेलत शेवटी ‘राजा’ डोलत बाजारात दाखल, मुहूर्ताच्या दराची उत्सुकता शिगेला

फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, जगभरातील आंबा खवय्यांची निराशा फळांचा राजा असलेल्या देवगडच्या हापूसने केलेले नाही. उलट प्रतिकूल परस्थितीमध्ये यंदा या आंब्याचे डिसेंबर महिन्यातच मुंबई बाजारपेठेत आगमन होत आहे.

वादळ, वारा, अवकाळी अंगावर झेलत शेवटी 'राजा' डोलत बाजारात दाखल, मुहूर्ताच्या दराची उत्सुकता शिगेला
देवगड हापूसचे महत्व कायम रहावे म्हणून आता खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 10:25 AM

मुंबई : फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, जगभरातील आंबा खवय्यांची निराशा फळांचा राजा असलेल्या देवगडच्या  (Mango Fruit Crop) हापूसने केलेले नाही. उलट प्रतिकूल परस्थितीमध्ये यंदा या आंब्याचे डिसेंबर महिन्यातच (Mumbai Agricultural Produce Market Committee) मुंबई बाजारपेठेत आगमन होत आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आंबा दाखल झाला होता. मंगळवारी हापूस आंबा दाखल होणार असल्याने कोकणच्या राजाच्या आगमनाची जय्यत तयारी व्यापाऱ्यांनी केली आहे. आता मुहूर्ताच्या आंब्याला काय दर मिळतो याकडे उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासह खवय्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

वाळकेवाडी गावच्या शेतकऱ्याला मिळाला मान

कुण्या शेतकऱ्याचा हापूस आंबा बाजारपेठेत सर्वाच आगोदर पोहचतो या देखील एक वेगळे महत्व असते. तीन महिन्यापूर्वीच देवगड तालुक्यातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांच्या आंब्याला मोहोर लागला होता. त्यानंतर योग्य जोपासना केल्यामुळेच आज हापूस आंब्याच्या 5 पेट्या मुंबई बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. गेल्या 5 वर्षात डिसेंबरमध्ये पहिल्या मोहोरचा आंबा मुंबई बाजारपेठेत आलेलाच नव्हता. मात्र, यावेळी प्रतिकूल परस्थितीमध्येही लवकर आंबा दाखल झाला आहे. मुंबई एपीएमसी येथील आंबा व्यापारी संजय पानसरे यांच्या गाळ्यावर पहिली पेटी येणार असून हापूसची विधीवत पूजा देखील पार पडली जाणार आहे.

ही सुरवात, मात्र फेब्रुवारीपासूनच खरा हंगाम

मंगळारी जरी हापूस आंब्याच्या 5 पेट्या दाखल होणार असल्या तरी हंगामाची खरी सुरवात ही फेब्रुवारीपासूनच होणार आहे. सध्या दाखल होत असलेला आंबा हा सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मोहोर लागलेला आंबा आहे. त्यानंतर मात्र, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मोहोरगळ झाली होती. यामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. याचा परिणाम आंब्याच्या किंमतीवरही होणार असल्याचे बोलले जात आहे. ही सुरवात झाली असली तरी फेब्रुवारी-मार्च पासूनच खरा हंगाम सुरु होणार आहे.

बहरात असलेल्या आंबा पिकाला अवकाळीचा फटका

यंदा आंबा पिकासाठी सर्वकाही पोषक वातावरण होते. मोहोराने झाडे लगडली होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहोर गळाला व न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. लवकर सुरु होणारा हंगाम लांबणीवर पडलेला असल्याने उशिराच संपणारही आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तीन टप्प्यांमध्ये होते आवक

कोकणातील हापूस आंब्याची तीन टप्प्यांमध्ये फूट होते. पहिला मोहोर हा सप्टेंबर आणि दुसरा मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा मोहोर हा जानेवारी महिन्यात असतो. त्यानुसार आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरु होते. आता जी आवक सुरु होणार आहे तरी पहिल्या टप्प्यातील आहे. वातावरणात बदलाचा फटका हा दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला बसलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मोहोराचे नुकसान झाले असले तरी तिसऱ्या टप्प्यातील मोहोर चांगलाच बहरलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी तिसऱ्या टप्प्यात नुकसान काही प्रमाणात नुकसान भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या :

शेती सांभाळत सेंद्रिय खत निर्मितीतून लाखोंची कमाई, कोल्हापूरच्या शेतकरी महिलेची प्रेरणादायी कहाणी…

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरला, शोध घेत मालक दाही दिशा फिरला..!

आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.