AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतमालाचा दाम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

रब्बी हंगामातील खरेदी केलेल्या पिकाची रक्कम राज्य सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे पाठवणार आहे. procurement payment online method

शेतमालाचा दाम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 19, 2021 | 7:24 PM
Share

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने रब्बी हंगामातील पिकाच्या खरेदीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या खरेदी प्रक्रियेदरम्यान राज्य सरकार थेट शेतकऱ्यंच्या खात्यात सर्व रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे पाठवणार आहे. गेल्या वर्षी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 50 टक्क्यांहून अधिक पेमेंट केले होते. राहिलेली रक्कम बाजारसमितीच्या पारंपारिक पद्धतीद्वारे पाठवली होती. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांना या बदलाबाबत आडत्यांशी चर्चा करण्यास सांगितलं आहे. (Haryana Chief Minister said crop procurement payment will credited through online method into account of farmers)

1 एप्रिलपासून खरेदी

हरियाणा राज्यात रब्बी पिकांची खरेदी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं खरेदी केंद्रांमध्येही या वेळी वाढ केली जाऊ शकते. शेतकरी व नोकरदारांना शेतमालाची विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरेदी व्यवस्था व अन्य मुद्द्यांचा आढावा घेत सूचना दिल्या. यंदा गहू, मोहरी धान, सूर्यफूल, हरभरा आणि बार्ली या पिकांची किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली जाईल.

कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की पीक कापणीचा हंगाम जवळ आला असल्याने खरेदी केंद्रांमध्ये पुरेशी व्यवस्था करावी. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेली वाढ लक्षात घेता शेतमाल खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. कोरोना प्रसार रोखण्यासाठीच्या प्रोटोकॉलचं पालन प्रत्येक खरेदी केंद्रावर काटेकोरपणे केले जावे. कोरोना नियमांचं पालनं जिल्हा उपायुक्तांनी करावे , अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. माझे पीक- माझी माहिती पोर्टलवर सर्व माहिती भरा,असं आवाहन खट्टर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

वाहतूकदारांसाठी सूचना

मंडईतील यंत्रणा बळकट करण्यासाठी तसेच मजुरांची, बारदान, पिशव्या व शिवणकामाची यंत्रणा इत्यादींची खात्री करुन घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बाजारसमित्यांमधून वेळेवर मालवाहतूक करता यावी यासाठी वाहतुकीची व्यवस्था बळकट करावी, अशा सूचना मनोहरलाल खट्टर यांनी दिल्या. एखादा वाहतूकदारानं 48 तासांमध्ये माल उचलला नाहीतर अडचण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

संबंधित बातम्या:

कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी 2000 रुपये जमा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2000 रुपये जमा होणार, यादीतील तुमचं नाव आजच चेक करा!

(Haryana Chief Minister said crop procurement payment will credited through online method into account of farmers)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.