ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’ ; 5 हजार मजुरांची तपासणी

यंदा ज्या गतीने ऊसाचे गाळप वाढत आहेत अगदी त्याच गतीने साखर काखान्यांनी सामाजिक उपक्रमही राबलेले आहेत. मध्यंतरी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे ऊसतोड मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने मूलभूत सुविधा पुरवल्या होत्या तर आता मजुरांच्या आरोग्य तपासणीचा वेगळाच पॅटर्न समोर येत आहे.

ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा 'इंदापूर पॅटर्न' ; 5 हजार मजुरांची तपासणी
इंदापूर येथील साखर कारखाना क्षेत्रात ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबीर पार पडले. 5 हजार मजुरांना याचा लाभ झाला.
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:21 PM

इंदापूर : यंदा ज्या गतीने ऊसाचे गाळप वाढत आहेत अगदी त्याच गतीने साखर काखान्यांनी सामाजिक उपक्रमही राबलेले आहेत. मध्यंतरी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे (Sugarcane Labourer) ऊसतोड मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने मूलभूत सुविधा पुरवल्या होत्या तर आता मजूरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’ समोर येत आहे. ऊस तोडणी चालु असताना थेट ऊसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणी मजूरांची (Health Check-up) आरोग्य तपासणी व जागेवरती मोफत (Medication) औषधोपचार देण्याचा अभिनव उपक्रम शंकरराव पाटील चारिटेबल ट्रस्टच्या वतीने राबवला गेला आहे. गेल्या दोन वर्षाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मजूरांचे आरोग्य तर उत्तम राहिले आहेच पण उपचाराची सोयही थेट ऊसाच्या फडात झाली होती. चालू हंगामात या ट्रस्टच्या माध्यमातून 5 हजार 100 ऊसतोड मजूरांची आरोग्य तपासणी झाली आहे. हाच अनोखा उपक्रम आता राज्यभर राबवला जावा अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मजूरांना लाभ

शंकररावजी पाटील चारिटेबल ट्रस्टच्या शंकरराव पाटील आरोग्य केंद्राच्या गेली 2 वर्षे चालु असलेल्या उपक्रमाचे अतिशय चांगले फायदे दिसून येत आहेत. कर्मयोगी शंकरराव पाटील व नीरा भीमा कारखाना या दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबविला जात आहे. त्यामुळे आरोग्याविषयी काही समस्या उद्भवल्या तर प्राथमिक उपचारही केले जात आहेत. ऊसतोड मजूरांसह त्याच्या कुटुंबियांनाही याचा लाभ घेता येत आहे.

अशी आहे उपचार पध्दती

किरकोळ आजारांवरती जागेवरच मोफत औषधे दिली जात आहेत तर गंभीर आजार असल्यास ऊसतोडणी मजुरांवर परिसरातील दवाखान्यामध्ये पुढील उपचार केले जात आहेत. शंकररावजी पाटील चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. कर्मयोगी व नीरा-भीमा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात चालू हंगामामध्ये आजपर्यंत सुमारे 5100 ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मजुरांना नामांकित कंपनीची औषधे पुरविली जात आहेत.

समितीसमोर सादरीकरण

कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखाना या दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबविला जात असणारा हा समाजोपयोगी उपक्रम राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी राबवण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेशी चर्चा झाली आहे. या अनोख्या उपक्रमाचे शासनाच्या मंत्री समितीसमोर सादरीकरण केले जाणार आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी मंत्री समितीची बैठक असते त्या दरम्यान याचे सादरीकरण झाले तर राज्यात इतर ठिकाणीही हा अनोखा उपक्रम सुरु होईल असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?

Success Story : 5 एकरामध्ये 9 पीकं अन् लाखोंचे उत्पन्न, नांदेडच्या तरुण शेतकऱ्यांचा अलगच अंदाज..!

Nandurbar Market: मिरची बाजारात ‘तेजी’, विक्रमी दर मिळून होईल का नुकसानाची भरपाई?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.