Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Suicide : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे. कारण सन 2020 मध्ये देशात तब्बल 5 हजार 979 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा देशातला आकडा झाला तरी या काळात सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत यामध्ये घट झाली असली तरी काळाच्या ओघात होत असलेल्या बदलानुसार 5 हजार 979 हा आकडाही काही कमी नाही.

Farmer Suicide : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 6:21 PM

मुंबई : काळाच्या ओघात केंद्र, राज्य सरकारने एक ना अनेक कृषी योजना उत्पादन वाढविण्यासाठी राबवल्या आहेत. शिवाय अत्याधुनिक प्रणालीचाही वापर या क्षेत्रात होत आहे. हे सर्व होत असताना मात्र, (Farmer Suicides) शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे. कारण सन 2020 मध्ये देशात तब्बल 5 हजार 979 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा देशातला आकडा झाला तरी या काळात सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत यामध्ये घट झाली असली तरी काळाच्या ओघात होत असलेल्या बदलानुसार 5 हजार 979 हा आकडाही काही कमी नाही.

देशात दरवर्षी शेतकरीच आत्महत्य़ा अधिकच्या असून याबाबत (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीच संसदेत ही माहिती दिली आहे. मात्र, यामागची कारणे त्यांनी स्पष्ट केली नसली तरी मध्यंतरी एनसीआरबी ने अहवाल प्रसिध्द केला होता. यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेती नुकसानीच्या नैराश्यातून शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचा उल्लेख होता. त्यामुळे एकीकडे आपण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हणत असलो तरी हे विदारक चित्र असलेली दुसरी बाजू आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वाधित आत्महत्या

देशात महाराष्ट्रात 2 हजार 567 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर यामध्ये मराठवाडा विभागात आत्महत्या अधिकच्या असल्याची नोंद एनसीआरबी ने अहवालात म्हटलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे शेती व्यवसयाचे होत असलेले नुकसान यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. याबाबत आत्महत्यामागचे कारण केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले नसले तरी एनसीआरबी यापूर्वी दिलेल्या अहवालात याची नोंद केलेली आहे. मराठवाड्यातील शेती ही पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. यातच गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उत्पान्नात घट आणि वाढत चाललेला कर्जाचा बोजा यामुळे नैराश्यात असलेल्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलेले आहे.

अशी आहे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी

2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे 2 हजार 567 घटना ह्या महाराष्ट्रात घडल्या आहेत तर त्यापाठोपाठ कर्नाटक राज्यात 1 हजार 72, आंध्र प्रदेश 564, तेलंगणा 466, मध्यप्रदेश 235, चंडीगढ 227,उत्तर प्रदेशमध्ये 87 तर तामिळनाडू राज्यात 2020 मध्ये 79, केरळमध्ये 57, आसाम 12 तर सर्वात कमी शेतकरी आत्महत्या ह्या मेघालय आणि मेझोराम राज्यात झाल्या आहेत.

या कारणांचाही आहे समावेश

कौटुंबिक समस्या, आजारपण, व्यसन, विवाह संबंधित विविध मुद्दे,संपत्तीचा वाद, व्यावसायिक समस्या अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे यांचे एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

करडई 10 हजारावर तरीही शेतकऱ्यांचा भर हरभाऱ्यावरच, काय आहेत कारणे?

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’?

नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा.
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला.
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट.
नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?
नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?.
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.