पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी
पिकांचा पंचनामा म्हणजे काय? आणि कोणती प्रक्रिया केल्यानंतर आपण नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात हे कायम असतात. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कशी असते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
लातुर : आठवडाभर झालेल्या (Rain) पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना अपेक्षा (Farmers expect) आहे ती नुकसान भरपाईची. नुकसान भरपाईच्या अनुशंगाने गावागावात वेगवेगळी चर्चाही असते. यामुळे नेमका पिकांचा पंचनामा म्हणजे काय? आणि कोणती प्रक्रिया केल्यानंतर आपण नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात हे कायम असतात. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कशी असते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात 2) पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते. 3) पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. 4) या दरम्यान शेतकऱ्याजवळ सातबारा उतारा, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. 5) पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो. 6) पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो. 7) महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे. 8) नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते. पंचनामा कसा केला जातो याची माहिती तलाठी सुदर्शन पाटील यांनी दिली आहे.
मराठवाड्यात झालेल्या पावसानंतर अद्यापही पंचनामे करण्यात सुरवात झालेली नाही. ऑनलाईनद्वारे नुकसानीची माहिती भरण्याचे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी कायम
अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.
नोंदणी केली तरी अडचणी कायमच
सोयाबीन ऐन बहरात असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात अधिकचा पाऊस झाला होता. शेतजमिन ही चिबडली होती. त्यामुळे सोयाबीन पिक पाण्यात होते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे तक्रारी नोंदविल्या होत्या मात्र, ना विमा कंपनीकडून त्याची पाहणी झाली ना कृषी अधिकारी बांधवर फिरकले.
संबंधित बातम्या :
अतिवृष्टीने खरिपही पाण्यात, शेतजमिनीही खरडल्या, मराठवाड्यात 3 लाख हेक्टरवर नुकसान
ऑनलाईनची सुविधा ऑफलाईन, शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी ?
केवळ पिक विमा भरुनच नाही तर नुकसान भरपाईसाठी करावी लागणार ‘ही प्रक्रिया’