टरबूज-खरबूजची लागवड करताना ‘अशी’ करा वाणांची निवड, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

उत्पादन वाढीसाठी पश्चिम महराष्ट्रासह मराठवाड्यात टरबूज आणि खरबूजाचेही क्षेत्र वाढत आहे. मात्र, योग्य नियोजन आणि लागवड करताना योग्य वाणांची निवड हेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेले वाण तसेच एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. देवराव देसरकर यांनी दिला आहे.

टरबूज-खरबूजची लागवड करताना 'अशी' करा वाणांची निवड, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
उन्हाळी हंगामात घेतले जाणारे टरबूज
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:30 AM

लातूर : यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांचे लक्ष आहे ते उत्पादनवाढीच्या अनुशंगाने. त्यामुळे मुख्य पिकांचे क्षेत्र घटले आहे तर तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचा अहवाल नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला आहे. उत्पादन वाढीसाठी पश्चिम महराष्ट्रासह मराठवाड्यात (Watermelon-Melon) टरबूज आणि खरबूजाचेही क्षेत्र वाढत आहे. मात्र, योग्य (Management) नियोजन आणि लागवड करताना योग्य वाणांची निवड हेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. (Agricultural University) कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेले वाण तसेच एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. देवराव देसरकर यांनी दिला आहे. काळाच्या ओघात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही पीक पध्दतीमध्ये बदल स्वीकारलेला आहे. आता गरज आहे ती उत्पादन वाढीची. त्यामुळे बदला बरोबर योग्य नियोजनाची गरज आहे.

जमिन अन् योग्य वाण

टरबूज-खरबूदज हे हंगामी पीक असून याच्या लागवडीसाठी मध्यम, काळी व पाण्याचा योग्य निचरा होणारी शेत जमिन निवडणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी एकाच जागी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय 15 फेब्रुवारीपर्यंत याची लागवड करता येते. मात्र, लागवड करण्यापूर्वी सर्वात महत्वाचे बियाणे 12 तास पाण्यात भिजवून लागवड करावी. टरबूजाची लागवड करताना अर्का माणिक, दुर्गापूर केशर, पुसा बेदाणा, शुगर बेबी, अर्का मधू या वाणांची तर खरबूजासाठी अर्का राजन, काशी मधू, हरा, अर्का जीत, पूसा मधू या वाणांची निवड केल्यास अधिकचे उत्पन्न मिळणार आहे.

लागवडीपूर्वी बिजप्रक्रिया महत्वाची

लागवड करताना कॉपर ऑक्झिक्लोराईड या बुरशी नाशकाची 3 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. जोपासणा करताना एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दत ही महत्वाची आहे. उन्हाळी हंगामात किडीचा प्रादुर्भाव कमी असला तरी योग्य वेळी पाणी आणि मशागत यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. हे गणितच लक्षात ठेऊन शेतकऱ्यांनी कमी कालावधीमधील या पिकांतून अधिकचे उत्पन्न घेणे गरजेचे आहे. काळाच्या ओघात कमी काळात अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी टरबूजाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांसमोरील अव्हानेही वाढत आहेत.

उन्हाळी हंगामात चारा पिकेही महत्वाची

जनावरांसाठी दुय्यम चारा म्हणून मका, कडवळ असाच चारा जनावरांना दिला जातो. मात्र, अशा चाऱ्यामधून शरीर पोषण व दुग्धोत्पादनासाठी असणारी पोषण तत्वाची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पशूंच्या खाद्याचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. यामुळे प्रतिलिटर दुग्धोत्पादनात प्रतिकोलो वजनवाढ यावरील खर्च वाढतो. त्यामुळे सकस चारा उत्पादन केल्यास जास्त पोषणमुल्ये पुरवठा करुन पशू खाद्यावरील खर्च कमी करण्यात येत असल्याचे डॉ. अनिता जिंतूरकर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

बळीराजाचं मरण कधी थांबणार? विदर्भातला आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढला

Rabbi Season : रब्बी हंगामातही तेलबियांचे क्षेत्र वाढले, मुख्य पिकांना शेतकऱ्यांनी डावलले

Papaya : पपईची लागवड साधली की उत्पन्नाची हमी, काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.