AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?

वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील कडधान्यावर देखील जाणवू लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण केले तर उत्पादनात वाढ होणार आहे. कारण यंदा सर्वकाही पोषक असताना गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने मोहरीवर चापा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे आढळून येताच वेळेचे महत्व जाणून शेतकऱ्यांनी लागलीच पिकाच्या ज्या भागामध्ये लागण झाली आहे तो भाग काढून टाकणे महत्वाचे आहे.

रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?
रब्बी हंगामामध्ये पीक पध्दतीमध्ये बदल झाला असून शेतकऱ्यांनी तेलबियांवर भर दिला आहे
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 3:19 PM

मुंबई : वातावरणातील बदलाचा परिणाम (Rabi Season) रब्बी हंगामातील कडधान्यावर देखील जाणवू लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण केले तर उत्पादनात वाढ होणार आहे. कारण यंदा सर्वकाही पोषक असताना गेल्या काही दिवसांपासून (Climate Change) वातावरणात बदल झाल्याने मोहरीवर चापा (pest infestation) किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे आढळून येताच वेळेचे महत्व जाणून शेतकऱ्यांनी लागलीच पिकाच्या ज्या भागामध्ये लागण झाली आहे तो भाग काढून टाकणे महत्वाचे आहे. विशेषत: या किडीचा उद्रेक हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि मार्चपर्यंत टिकतो. ही किड वनस्पतींच्या खोडातून, फुलांपासून, पानांमधून आणि नवीन शेंगा पासून रस शोषून समूहाला कमकुवत बनवते. त्यामुळे मोहरी पिकावर बुरशी वाढते तर काही भाग हा चिकट होतो.

तर दुसरीकडे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटीअळीचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एका एकरामध्ये 3 ते 4 T आकाराचे सापळे लावणे महत्वाचे आहे. यामध्ये किड साठली जाऊन नंतर ती नष्ट करणे महत्वाचे आहे. कोबीच्या पिकात डायमंड बॅक कॅटरपिलर, मटारमध्ये पॉड बोरर्स आणि टोमॅटोमध्ये फ्रूट बोरर्सची काळजी घ्या.

गाजराचे बियाणे बनवण्यासाठी हीच योग्य वेळ

कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले की हा मोसम गाजराचे बियाणे तयार करण्यासाठी योग्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी सुधारित वाणांचे उच्च दर्जाचे बियाणे वापरले आहे गाजराचे पीक 90 ते 105 दिवसाचे झाले आहे त्यांनी या जानेवारी महिन्यात खोदकाम केले तरी बियाणे तयार करता येणार आहे. मात्र, हे करीत असताना लांब गाजर निवडले पाहिजे शिवाय त्याला पानेही कमीच असली पाहिजेत अशाच गाजरांची बिजोत्पादनासाठी निवड करावी लागणार आहे. या गाजरांची पाने 4 इंच सोडून कापून घ्या. गाजराचा वरचा 4 इंचाचा भाग ठेवा आणि उर्वरित कापा. आता 45 सेंमी अंतरावर रांगेत 6 इंच अंतराने त्याची लागवड करुन लागलीच पाणी दिले तर बिजोत्पादन उत्तम पध्दतीने होणार आहे.

अशी करा कांद्याची लागवड

सध्या उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीचे काम जोमात सुरु आहे. मात्र, लागवड करताना शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. 6 आठवड्यांपेक्षा अधिकच्याच कालावधीचे रोपांची लागवड करणे गरजेचे आहे. लहान-लहान वाफे तयार करुन लागवड करावीव लागणार आहे जेणेकरुन पाण्याचे नियोजन करता येणार आहे. लागवडीच्या 10-15 दिवस आधी शेतात 20-25 टन सडलेले शेणखत घाला. रोप लागवड करताना काही वेळ पूर्वी 20 किलो नायट्रोजन, 60-70 किलो फॉस्फरस आणि 80-100 किलो पोटॅश लागवड क्षेत्रावर घालावे लागणार आहे. तर रोप अधिक खोलीवर लावयाचे नाही तर दोन वाफ्यांमध्ये 15 सेंमी अंतर आणि दोन रोपांमध्ये 10 सेमी अंतर ठेवणे महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

farmer producer company: आता शेतकरी उत्पादक कंपन्याही करणार तूरीची खरेदी, नेमका फायदा काय?

Rabi Season : शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण मुख्य पिकालाच फटका बसला

Grape Growers Association: निर्णय झाला- आता माघार नाही, सोलापूर विभागातही ठरले द्राक्षांचे दर

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....