Prediction of Rain : भेंडवळच्या घटमांडणीला 300 वर्षांची परंपरा, या दिवशी ठरते शेती व्यवसयाची भविष्यवाणी

शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर आधारित झालेला आहे. अधिकचा पाऊस होऊनही नुकसान हे ठरलेलेच आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होऊनही उत्पादनात वाढ झाली नव्हती. त्यामुळे घटमांडणीतून काय अंदाज बांधला जातो हे महत्वाचे आहे. तर दुसरीकडे सध्या राजकीय क्षेत्रात पक्षांकडून होत असलेले आरोरप-प्रत्यारोप यामधून काय साध्य होणार तसेच आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणूका होत आहेत. त्याअनुशंगाने हे भाकीतही महत्वाचे ठरणार आहे.

Prediction of Rain : भेंडवळच्या घटमांडणीला 300 वर्षांची परंपरा, या दिवशी ठरते शेती व्यवसयाची भविष्यवाणी
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे घटमांडणी करुन शेती आणि राजकीय स्थितीची भविष्यवाणी केली जाते.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 11:08 AM

बुलडाणा : (Indian Meteorological Department) भारतीय हवामान विभागाने यंदाही सरासरीच्या तुलनेत अधिकच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा शास्त्रशुध्द पध्दतीने वर्तवलेला अंदाज असला तरी भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने (Rain forecast) पावसाची आणि शेतातील पिकांबद्दल जी भविष्यवाणी केली जाते त्याला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. अशीच भविष्यवाणी (Buldana) जिल्ह्यातील भेंडवळ येथे घटमांडणी रुपाने केली जाते. गेल्या 300 वर्षापासून ही भविष्यवाणी केली जाते. एवढेच नाही तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारे ही घटमांडणी असते विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते. या घटमांडणीचे भाकीत 4 मे रोजी वर्तवण्यात येणार आहे.

घटमांडणीची अशी हा पार्श्वभूमी

पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या या भेंडवल गावात चंद्रभान महाराज यांनी 300 वर्षापूर्वी घटमांडणीची सुरुवात केली होती. त्यामुळे या घटमांडणीला तीनशे वर्षांपासून ची परंपरा आहे. 3 मे रोजी घटमांडणी करून 4 मे रोजी पहाटे हे भाकित वर्तवले जाणार आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे भाकीत जाहीर करणार आहेत.सध्याची राजकीय स्थिती आणि त्याच अनुशंगाने वर्तवले जाणारे भाकित याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अशी असते घटमांडणी

अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी गावा शेजारील एका शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते, घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, यासह इतर अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीचे ढेकळे आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, सांडोली, कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात, आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता यामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून, शेतकरी, आर्थिक, सामाजिक, पिक पाणी या संदर्भात हे भाकित वर्तवले जाते.

हे सुद्धा वाचा

शेतीसह राजकीय स्थितीमुळे महत्व

शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर आधारित झालेला आहे. अधिकचा पाऊस होऊनही नुकसान हे ठरलेलेच आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होऊनही उत्पादनात वाढ झाली नव्हती. त्यामुळे घटमांडणीतून काय अंदाज बांधला जातो हे महत्वाचे आहे. तर दुसरीकडे सध्या राजकीय क्षेत्रात पक्षांकडून होत असलेले आरोरप-प्रत्यारोप यामधून काय साध्य होणार तसेच आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणूका होत आहेत. त्याअनुशंगाने हे भाकीतही महत्वाचे ठरणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.