Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report : मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, आता रिमझिम, पिके वाचवण्याची शेतकऱ्यांजवळ संधी

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आहे तर त्या पोठोपाठ हिंगोलीमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. आता पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असले तरी 22 आणि 23 जुलै रोजी याच दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरम्यानच्या चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांना शेतीकामे उरकून घ्यावी लागणार आहेत. शिवाय 23 ते 28 दरम्यानच्या काळात मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Weather Report : मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, आता रिमझिम, पिके वाचवण्याची शेतकऱ्यांजवळ संधी
मराठवाड्यात आता रिमझिम पावसाचा इशारा आहे.
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 5:05 PM

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून (Marathwada) मराठवाड्यासह राज्यात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान हे झालेच आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून (Rain) पावसाचा जोर कमी झाला आहे. संपूर्ण पाऊस गायब झाला नसला तरी प्रमाण कमी झाल्याने  (Kharif Season) खरिपातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. असे असले तरी पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे तर 22 आणि 23 जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना रखडलेली शेती कामे तर करता येणार आहेतच पण पिके वाचवण्यासाठीही विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत.

ढगाळ वातावरण, किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा धोका टळला असला तरी या वातावरणामुळे पिकांवर किड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शिवाय आगोदरच शंकू गोगलगायीने पिके फस्त करण्याचा धडाका सुरु केला आहे. शिवाय आता ढगाळ वातावरणामुळे किडी बरोबरच पिकांमधील तणही वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या मशागती बरोबरच पीक फवारणीही करावी लागणार आहे.

हिंगोली, नांदेडवर वरुणराजाची कृपादृष्टी

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड जिल्ह्यामध्ये झाला आहे तर त्या पोठोपाठ हिंगोलीमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. आता पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असले तरी 22 आणि 23 जुलै रोजी याच दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरम्यानच्या चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांना शेतीकामे उरकून घ्यावी लागणार आहेत. शिवाय 23 ते 28 दरम्यानच्या काळात मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनो आता या कामावर लक्ष केंद्रीत करा

पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. त्यामाध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले तरी सोयाबीन हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चारीद्वारे पाणी वावराबाहेर येईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्यां किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे असल्याचे लातूरचे कृषी उपविभागीय अधिकारी कदम यांनी सांगितले आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.