लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!
अखेर लाल कांद्याच्या भावाने उच्चांकी सीमोल्लंघन करत नाशिक जिल्ह्यात क्विंटलमागे तब्बल 5151 रुपयांचा भाव पटकावला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झोडपलेल्या आणि खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक पाहायला मिळत आहे.
नाशिकः अखेर लाल कांद्याच्या भावाने उच्चांकी सीमोल्लंघन करत नाशिक जिल्ह्यात क्विंटलमागे तब्बल 5151 रुपयांचा भाव पटकावला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झोडपलेल्या आणि खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक पाहायला मिळत आहे.
उमराणे (जि. नाशिक) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल असणाऱ्या पावसाळी कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा यांच्यासह कांदा व्यापारी उपस्थित होते. यावेळी उमराणे येथील शेतकरी रणजीत देवरे यांनी आणलेल्या कांद्याला क्विंटलमागे सर्वोच्च 5151 रुपयांचा भाव मिळाला. यावेळी शेतकरी देवरे यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अजून महिनाभर तरी लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कांद्याचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे या वर्षी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. त्याचा फटका लाल कांद्यालाही बसला. त्यामुळे बाजारात या कांद्याची आवक तशीही कमी आहे. सध्या उमराणे बाजार समितीमध्ये या कांद्याची जवळपास एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वात जास्त भाव हा 5151 मिळाला असून, सर्वात कमी भाव 1100 रुपये इतका मिळाला आहे. तर सरासरी 2700 रुपयांनी कांद्याची विक्री झाल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे यंदा इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. खरिपासह या भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. मात्र, सध्या तरी लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू आले आहे.
साठवणुकीचा फायदा
योग्य दर मिळला नाही, तर शेतकरी कांद्याची साठवणूक कांदा चाळीत करून ठेवतात. नाशिकसह राज्यातील उत्पादकांना कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. दरवर्षी अगोदर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील लाल कांदा बाजारात येतो. आणि याच कांद्याला अधिकचा दरही मिळतो. यंदा मात्र, पावसामुळे या राज्यातील कांदा नाशिकच्या बाजारात दाखल होऊ शकला नाही. त्याचाच फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजारात आणल्याने त्यांना वाढीव दर मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्याः
शिरजोर चोरट्यांची दसऱ्यादिवशी सलामी; गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून नाशिकमध्ये 23 लाखांची धाडसी चोरी
डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांक
डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांकhttps://t.co/B4rDlKToaa#Nashik|#ChikunGunya|#Dengue|#NashikMunicipalCorporation|#NashikHealthDepartment|#Patientsreachedafiveyearhigh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021