कांद्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कोण खातयं ‘भाव’? नव्याने आवक अन् विक्रमी दरही

गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही चर्चेत आहे ती, कांद्याची विक्रमी आवक आणि विक्रमी दर.यामुळे बाजार समितीची तुलना थेट अशिया खंडातील कांद्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावशी करण्यात आली आहे. आता कांद्याची आवक कमी झाली असली तर बेदाण्याची आवक आणि विक्रमी दर हे दोन्ही प्रकार येथील बाजार समितीमध्ये पाहवयास मिळत आहेत.

कांद्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कोण खातयं 'भाव'? नव्याने आवक अन् विक्रमी दरही
बेदाणा निर्मिती
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 12:37 PM

सोलापूर : गेल्या दोन महिन्यांपासून (Solapur Market) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही चर्चेत आहे ती, कांद्याची विक्रमी आवक आणि विक्रमी दर. यामुळे बाजार समितीची तुलना थेट अशिया खंडातील कांद्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावशी करण्यात आली आहे. आता कांद्याची आवक कमी झाली असली तर (Raisin Arrival) बेदाण्याची आवक आणि विक्रमी दर हे दोन्ही प्रकार येथील बाजार समितीमध्ये पाहवयास मिळत आहेत. सध्या द्राक्ष तोडणी अंतिम टप्यात आहे असे असताना सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाण्याचा पहिलाच सौदा गुरुवारी झाला असून 311 रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे. तर (Raisin Auction) सौद्याच्या पहिल्याच दिवशी बेदाण्याची 40 टनाची आवक झाली आहे. विशेष म्हणजे ही सर्व आवक जिल्हा भरातून म्हणजेच स्थानिक भागातून झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात होणारी घट ही बेदाण्यातून भरुन निघणार का हे पहावे लागणार आहे. पहिल्याच सौद्यासाठी नाशिक, सांगली या भागातील व्यापारी उपस्थित होते.

अडचण दूर बेदाणा निर्मीती जोमात

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादनात मोठी घट झाली असून यंदा दरवाढ आणि बेदाण्यातून उत्पादन या बाबींवरच भर दिला जाणार आहे. मध्यंतरी थंडीमुळे द्राक्ष हे तडकत होते तर त्यापासून बेदाणा निर्मिती पोषक वातावरणही नव्हते. त्यामुळे यंदा महिन्याने द्राक्ष हंगाम लांबणीवर पडणार आहे. मात्र, आता पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे सांगली, तासगाव, पंढरपूर आणि नाशिक येथून बेदाण्याची आवक सुरु झाली आहे.

द्राक्षातून नुकसान, बेदाण्यातून भरपाई

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे. पण शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च झाला आहे. द्राक्ष घड भरत असतानाच सुरु झालेले संकट द्राक्ष विक्रीपर्यंत कायम होते. शिवाय मंध्यंतरी थंडी वाढल्याने तोडणीला आलेल्या द्राक्षांना तडे गेले होते. अशा अवस्थेतही आता निर्यात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे बेदाणा निर्मितीमध्येही वाढ होत आहे. सोलापूरमध्ये 40 टन बेदाण्याची आवक झाली असून ते ही स्थानिक बाजारपेठेतून. त्यामुळे बेदाणा निर्मिती वाढलेली आहे. वाढलेल्या आवकबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.

आता दर गुरुवारी सौदे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, दक्षिण सोलापूरमध्ये बेदाण्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. शिवाय आता तापमानात वाढ झाल्याने ही प्रक्रिया वाढलेली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना बेदाणा विक्रीसाठी सांगली, तासगाव ही बाजारपेठ जवळ करावी लागत होती. पण आता सोलापूर येथे दर गुरुवारी बेदाणा सौदे होणार असल्याने येथील दराचा लाभ घेण्याचे अवाहन बाजार समिती सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?

Sugar Factory : ऊसाचे गाळप रखडले, चिंता कशाला..! काय आहेत शेतकऱ्यांकडे पर्याय?

रब्बी अंतिम टप्प्यात तरी शेतकऱ्यांना प्रतिक्षा हक्काच्या पाण्याची, पाटबंधारे विभागाने ‘लिफ्ट’च दिली नाही

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.