AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : तोडणीअभावी सर्वात मोठ्या नगदी पिकाचे नुकसान, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस फडात

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी यंदा ते नुकसानीचे ठरत आहे. यंदाच्या गाळप हंगामास 7 महिने पूर्ण होऊन देखील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे वजनात घट तर निश्चितच मानली जात आहे पण हंगामात ऊसाची तोड होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल करुन ऊसाची लागवड केली मात्र, पहिल्याच वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्याने आगामी काळात ऊस लागवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल अशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

Nanded : तोडणीअभावी सर्वात मोठ्या नगदी पिकाचे नुकसान, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस फडात
हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 9:40 AM
Share

नांदेड :ऊस हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक असले तरी यंदा ते नुकसानीचे ठरत आहे. यंदाच्या गाळप हंगामास 7 महिने पूर्ण होऊन देखील (Surplus Sugarcane ) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे वजनात घट तर निश्चितच मानली जात आहे पण हंगामात ऊसाची तोड होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल करुन ऊसाची लागवड केली मात्र, पहिल्याच वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्याने आगामी काळात ऊस लागवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल अशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारखान्यांकडून तोडीचे नियोजन झाले नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारणच विस्कळीत झाल्याचे चित्र केवळ नांदेडच नाही पण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे.

निर्णय झाला अंमलबजावणीचे काय?

मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस तोडणीची जबाबदारी ही पश्चिम महाराष्ट्रातील 35 कारखान्यांवर देण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता. यामुळे काही प्रमाणात का होईना ऊसतोड होईल अशी आशा होती. मात्र, अद्यापपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे ऊसाच्या वजनात तर घट सुरुच आहे. पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊसाची तोड होणार की शेतकऱ्यांनाच ऊस पेटवून क्षेत्र रिकामे करावे लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा मराठवाड्यात निर्माण झालेला आहे. कारखान्यांनीही क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. पण शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

वेळेत तोड न झाल्यावर नेमका परिणाम काय?

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.

पारंपरिक पिके परवडली

उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके डावलून ऊसाची लागवड केली. मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनीही हे धाडस केले. पण आता ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे दर वाढत आहेत. त्यामुळे पारंपरिक पिके चांगली असे म्हणण्याची वेळ आल्याचे नांदेड येथील शेतकरी प्रकाश लोणे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Orchard Cultivation: पारंपरिक पिकांना डावलून फळबाग क्षेत्रात वाढ,योजनांचा लाभ उत्पादनात वाढ अन्

Drip Irrigation : पीक पध्दतीमध्येच नाही तर सिंचनामध्येही बदल, चार वर्षात शेतकऱ्यांना समजले पाण्याचे महत्व

महागाईच्या वणव्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ, Basic गरजांच्या पूर्ततेसाठी तारेवरची कसरत

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.