या राज्यात जनावरांना 1 दिवस ‘वीक ऑफ’! 100 वर्षांची परंपरा
तुम्ही कधी प्राण्यांच्या साप्ताहीक अवकाशच्या बाबत काही ऐकलं आहे का ? या राज्यात प्राण्यांना सुट्टी देण्याची परंपरा मागच्या 100 वर्षांपासून सुरु आहे. जाणून घ्या याची सुरुवात कशी झाली.
मुंबई : कोणत्याही शासकीय किंवा खासगी कार्यालयात जी व्यक्ती काम करते, त्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी (week off) मिळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की जनावरांना सुध्दा आठवड्यातून एक दिवस सुट्टी दिली जाते. ही परंपरा झारखंड (jharkhand) या राज्यात लातेहरच्या २० पेक्षा अधिक गावात मागच्या १०० वर्षांपासून सुरु आहे. बैल आणि गाई गुरांना रविवारी काम लावलं जातं नाही. त्या दिवशी त्यांना आठवड्याची सुट्टी दिली जाते. त्या दिवशी सुट्टी देण्याचं कारण असं आहे की, त्यांच्या आठ दिवसाचा थकवा (animal viral news) निघून जाईल.
जनावरांना मिळतो एक दिवस आराम
लातेहार येथील माणूस आणि प्राणी यांच्यात मागच्या जन्मापासून संबंध आहेत. त्यामुळे तिथली माणसं जनावरांना सुख सुविधा अधिक देतात. जनावरांच्या मेहनतीमुळे लोकांचे संसार चालतात. अधिक मेहनत घेणाऱ्या जनावरांना आराम देण्यासाठी लातेहारच्या काही गावात एक नियम तयार केला आहे. त्या दिवशी सगळ्या जनावरांना सुट्टी दिली जाते. म्हणजेच रविवारी कुठल्याही जनावराकडून काम करुन घेतलं जात नाही. गुरांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याची परंपरा लातेहार जिल्ह्यातील हर्खा, मोंगार, लालगडी आणि पक्रारसह इतर अनेक गावांमध्ये प्रचलित आहे.
गावातल्या लोकांचं हे म्हणणं आहे की, पूर्वीच्या लोकांनी जे नियम तयार केले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाला आराम गरजेचा आहे. त्याचपद्धतीने जनावरांना सुध्दा सुट्टी दिली जाते. जनावर मनुष्याला अधिक मदत करतो, अशा स्थितीत त्यांची काळजी घेणं माणसाचं काम आहे. आम्ही पूर्वीच्या लोकांनी जे काही नियम तयार केले आहेत. ते आम्ही अजूनही पाळत आहोत, ते नियम चांगले आहेत. त्यांनी खूप विचार करुन तो निर्णय घेतला आहे.
ही परंपरा मागच्या १०० वर्षांपासून सुरु आहे. कारण तिथले शेतकरी सांगतात त्यावेळी एका बैलाचा अति कामामुळे मृत्यू झाला होता. त्यावर सगळ्या शेतकऱ्यांनी विचार केला होता. मनुष्याचं आणि बैलाचं काम कमी करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी बसलेल्या पंचायतीने निर्णय घेतला होता की, जनावरांना आणि गाईगुरांना एक दिवसाची सुट्टी देण्यात यावी.