गंधकाच्या वापरामुळे पिके बहरात अन् उत्पादनातही वाढ, पहा काय आहेत फायदे ?
उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करतात. मात्र, या प्रयोगांना योग्य नियोजनाची जोड दिली तर त्याचा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना होतो. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते गंधक. गंधकाच्या वापरामुळे पिके तर बहरतातच पण उत्पादनातही वाढ होते. गंधक हे आवश्यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी गंधक काय एक आवश्यक घटक आहे.
लातूर : उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करतात. मात्र, या प्रयोगांना योग्य नियोजनाची जोड दिली तर त्याचा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना होतो. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते गंधक. (Sulphur use) गंधकाच्या वापरामुळे पिके तर बहरतातच पण उत्पादनातही वाढ होते. गंधक हे आवश्यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी गंधक काय एक आवश्यक घटक आहे. (crop growth) जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असून वनस्पती श्वसन क्रिया, तेलनिर्मिती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
काळाच्या ओघात उत्पादनवाढीसाठी संकरीत वाणच प्रत्येक हंगामात घेतले जात आहे. या वाणाची पिके मोठ्या प्रमाणावर गंधकाचे शोषण करतात. मात्र, शेतकऱ्यांकडून जमिनीमध्ये योग्य प्रमाणात गंधकयुक्त खते टाकली जात नाहीत तर युरियाचा वापर हा वाढत आहे. पण गंधकामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा कसा होतो हे आपण पाहणार आहोत.
गंधक पिकावाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य
गंधकाच्या वापरामुळे केवळ पिकेच बहरतात असे नाही तर जमिनीचेही आरोग्य वाढते. जमिनीचा पोत वाढल्याने उत्पादनावर आणि मशागतीवरही अनुकूल परिणा होतो. गंधकाचा योग्य वापर केला तर उत्पादनात तर वाढ होतेच शिवाय पिकाची गुणवत्ताही वाढते. गंधकाला भूसुधारक असेही म्हणतात. गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. धान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासही गंधक हे उपयोगी ठरते. तर गंधकामुळे पर्यावरण संवर्धन तर होतेच पण इतर अन्नद्रव्यांसोबत याचाही सकारात्मक फायदा होतो.
पिकवाढीमध्ये गंधकाचे नेमके कार्य काय?
उत्पादनवाढीच्या आणि पिकवाढीच्या अनुशंगाने गंधकाचे कार्य आहे. एकतर प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मिती ला चांगली चालना मिळते. वनस्पतींमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ हे गंधकामध्ये आढळते त्यामुळे तेलयुक्त पदार्थामध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यासही याची मदत होते. यामध्ये हरीतद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. वनस्पतींच्या निरनिराळ्या विकराच्या व चयापचयाच्या क्रियेत ते मदत करते. फळे पोसण्यातही गंधकाची महत्वाची भुमिका आहे.
गंधकाचा वापर न केल्यास काय तोटा
योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात गंधकाचा वापर झाला नाही पिकांची पाने ही पिवळी पडतात. तर फळे पिवळसर व हिरवीच दिसतात त्यामुळे योग्य दरही मिळत नाही. शिवाय फळांची वाढ कमी होते, रंग बदलतो व आतील गरही कमी होतो. नवीन येणारी पाने आणि पालवी पिवळी पडू लागते. देठ किरकोळ व आखूड राहतात. कोवळ्या पानांवर जास्त परिणाम दिसतो. गंधकाचा वापर नाही केला तर पानांच्या कडा व शेंडे गळतात प्रथिने आणि तेलाचे प्रमाण घटते.