Agricultural Department : ज्वारीची उत्पादकता वाढली उत्पादन घटले, दरावर काय होणार परिणाम ?

पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे यंदा ज्वारीची हेक्टरी उत्पादकता वाढली आहे. मात्र, मूळातच पेरणी क्षेत्र निम्म्याने घटल्याने यंदा उत्पादनही कमालीचे घटले आहे. एकंदरीत पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना उतारा चांगला मिळाला आहे. शेतकऱ्यांनी यंदाच्या उन्हाळी हंगामात पीक पध्दतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन रब्बी हंगामातील मुख्य असलेल्या ज्वारीलाच बाजूला सारले होते. गेल्या 20 वर्षात ज्वारीच्या क्षेत्रात जवळपास निम्म्याने घट झाली आहे.

Agricultural Department : ज्वारीची उत्पादकता वाढली उत्पादन घटले, दरावर काय होणार परिणाम ?
रबी हंगाम संपताच बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:37 AM

लातूर : पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे यंदा (Sorghum crop) ज्वारीची हेक्टरी उत्पादकता वाढली आहे. मात्र, मूळातच पेरणी क्षेत्र निम्म्याने घटल्याने यंदा उत्पादनही कमालीचे घटले आहे. एकंदरीत पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना उतारा चांगला मिळाला आहे. शेतकऱ्यांनी यंदाच्या उन्हाळी हंगामात पीक पध्दतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन ( Rabi Season)) रब्बी हंगामातील मुख्य असलेल्या ज्वारीलाच बाजूला सारले होते. (Maharashtra) राज्यात गेल्या 20 वर्षात ज्वारीच्या क्षेत्रात जवळपास निम्म्याने घट झाली आहे. यंदा केवळ 12 लाख 44 हजार हेक्टरावरच पेरा झाला होता. घटत्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेत ज्वारीची साठवणूक केली तर भविष्यात दर वाढतील असा अंदाज आहे. सध्या 2 हजारपासून 3 हजार रुपये क्विंटल असे दर आहेत.

कापणी प्रयोगानंतर कृषी विभागाचा अंदाज काय?

हंगाम अंतिम टप्प्यात असताना प्रत्येक पिकाचा कापणी प्रयोग करुन उत्पादकतेचा अंदाज हा कृषी विभागाकडून केला जातो. आता पर्यंत 70 टक्के कापणी प्रयोगातून कृषी विभागाने एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये बागायती ज्वारीचे हेक्टरी 10 क्विंटल तर जिरायती क्षेत्रावर 7 क्विंटल असे उत्पादन निघण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हेक्टरी उत्पादकता वाढली असली तरी उत्पादनात मात्र, घट होणार हे निश्चित आहे. दिवसेंदिवस राज्यात ज्वारीचे क्षेत्र हे झपाट्याने घटत आहे. शेतकऱ्यांचा कल हा नगदी पिकांवर आहे. तर ज्वारीमधून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे राज्यात 2000 साली 31 लाख 84 हजार हेक्टरावर ज्वारीचा पेरा होता. यंदा केवळ 12 लाख 44 हजार हेक्टरावर ज्वारी होती.

ज्वारी अन् कडब्याचेही वाढणार दर

ज्वारीचे क्षेत्र घटल्याने यंदा उत्पादनही कमी होणार आहे. राज्यातील सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. पण काळ्याच्या ओघात ज्वारी काढणी, मोडणी, जोपासणा, मळणी यासारखी कष्टाची कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर नगदी पिकांवर आहे. यंदा उत्पादन घटल्यामुळे ज्वारीसह जनावरासाठी चारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडब्याचेही दर वाढणार आहे. सध्या ज्वारीला 2 हजार ते 3 हजार या दरम्यानेचा भाव आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीची योग्य प्रकारे साठवणूक करुन ठेवली तर विक्रमी दर मिळेल असा विश्वास व्यापारी व्यक्त करीत आहेत.

ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकची मागणी

कडबा हे जनावरांचा मुख्य चारा आहे. पावसाळ्यात हिरवळीनंतर जनावरांना ज्वारीच्या याच कडब्याचा आधार असतो. अद्यापही कडब्याची आवक सुरु झाली नसली तरी जुलै-ऑगस्टच्या दरम्यान कडब्याला विक्रमी दर मिळणार आहे. पावसानंतर लागलीच हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्या दरम्यान, या कडब्याशिवाय पर्यायच नसतो. अनेक शेतकरी ज्वारीमुळे नाही तर कडब्यामुळे ज्वारी पीक घेतात. यंदा दोन्हामधून उत्पन्न मिळेल असा आशावाद आहे.

संबंधित बातम्या :

Washim : निर्णय झाला पण दिलासा नाही, शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर टांगती तलवार

Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं

Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.