Agriculture News : पंधरा गावांना शेतीसाठी अनियामित वीजपुरवठा, शेतकऱ्याच्या रब्बी पिकांना फटका

Agriculture News : या कारणामुळे रात्री करण्यात येणारा वीजपुरवठाच बरा असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीये

Agriculture News : पंधरा गावांना शेतीसाठी अनियामित वीजपुरवठा, शेतकऱ्याच्या रब्बी पिकांना फटका
dhule agriculture newsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 9:41 AM

धुळे : धुळे तालुक्यातील (Dhule News) कापडणे गावासह इतर पंधरा गावांना शेतीसाठी (Agriculture News) अनियामित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्याच्या रब्बी पिकांना (rabi crops) फटका बसतं आहे. धुळे तालुक्यातील नगाव, कापडणे, न्याळोद, कवठाळ, विश्वनाथ, दमाने, तामसवाडी, हैंळवाडी, धनुर आदी गावांना आठ दिवस दिवसा, तर आठ दिवस रात्री शेतीसाठी पुरवठा करण्यात येत असतो. मात्र दिवसा वीजपुरवठा करताना अनेक वेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यामुळे सध्या दोन एकर शेतीला देखील पूर्ण पाणी देता येत नाही. त्यामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नियमित दिवसा वीस पुरवठा करावा अन्यथा तो रात्री करण्यात येणारा वीजपुरवठाच बरा असा शेतकरी म्हणू लागले आहेत. कारण दिवसा दिला जाणारा वीज पुरवठा हा सतत खंडित होत असतो.

हे सुद्धा वाचा

23 गावातील विहिरींच अनुदान अद्याप देण्यात आलं नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या तालुक्यामध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातील जनतेला करावा लागतो. यासाठी शासन दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहीत करून त्यातून पाणीपुरवठा करते. मात्र अधिग्रहीत करण्यात आलेल्या या विहिरींच अनुदान अद्याप देण्यात आलेलं नाही. 23 गावातील विहिरींच अनुदान अद्याप देण्यात आलं नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी विहीर अधिग्रहीत करू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शासनाने विहीर अधिग्रहण अनुदान तात्काळ देण्याची मागणी स्थानीक लोकप्रतिनिधी केली आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.