शेतातील कष्टाशी नियोजनाची सांगड, कुटुंबीयांची भक्कम साथ; जळगावच्या पाटील बंधूंची डाळिंबातून 50 लाखांची कमाई

ळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणि दुष्काळावर मात करत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

शेतातील कष्टाशी नियोजनाची सांगड, कुटुंबीयांची भक्कम साथ; जळगावच्या पाटील बंधूंची डाळिंबातून 50 लाखांची कमाई
डाळिंब
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 4:49 PM

जळगाव: कोरोना विषाणू संसर्ग आणि त्यानंतर करण्यात आलेले लॉकडाऊनमुळे अनेक जणांनी शेतीचा रस्ता धरला. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानं सावरलं आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणि दुष्काळावर मात करत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांची नावं नवनीत दत्तात्रय पाटील आणि दिलीप दत्तात्रय पाटील अशी आहेत. कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर आणि योग्य नियोजनाद्वारे त्यांनी 7 एकर शेतात डाळिंबाचं विक्रमी उत्पन्न घेतलं आहे.

50 लाखांचं विक्रमी उत्पादन

मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथील शेतकरी नवनीत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांनी कोरोनावर आणि दुष्काळावर मात करत जाळिंबाची लागवड केली. नवनित दत्तात्रय पाटील ,दिलीप दत्तात्रय पाटील या दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी सर्व सदस्यांनी एकत्र त्यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यानं त्यांनी 7 एकर शेतात डाळिंबाचं 900 किंटल उत्पन्न घेतलं आहे. पाटील बंधूंना डाळिंबाच्या शेतीतून पन्नास लाखांचं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे.

इतर शेतकर्‍यांसमोर आदर्श

नवनीत पाटील आणि दिलीप पाटील यांनी एकत्रित येत केलेल्या शेतीमुळे इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा राहिला आहे. पाटील यांच्या शेतातील डाळिंब आता बांग्लादेशला देखील निर्यात केली जाणार आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहकार्यानं हे शक्य झाल्याचं पाटील बंधू सांगतात.

मुक्ताईनगरची डाळिंब थेट बांग्लादेशला

मुक्ताईनगर तालुक्यातील डाळिंब आता थेट बांगलादेशात जाणार आहेत. पंढरपूर येथील व्यापाऱ्याच्या माध्यमातून जाणार असल्याची माहितीदेखील नवनीत पाटील यांनी दिली. आपण नियोजन योग्यरीत्या केले तर शेतात काही उत्पन्न घेऊ शकतो. फळ बागायत वाढल्यामुळे हालाखीच्या परिस्थितीवर मात केली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्या शेतीचा विस्तार आता शंभर एकरापर्यंत पोहोचला आहे.

मजुरांना हमखास रोजगार उपलब्ध

नवनीत पाटील आणि दिलीप पाटील यांच्या शेतात तालखेडा गावातील आणि मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागातील 40 ते 50 मजूर देखील त्यांच्या शेतात रोज कामाला आहेत. पाटील बंधूंनी डाळिंब बागायत आणि इतर शेतीच्या कामाच्या माध्यमातून इतरांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे.

इतर बातम्या:

VIDEO | द्राक्षाची बाग तोडून कारल्याची लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

महिला शेतकरी सशक्तिकरण योजनेच्या खर्चात 6 पट घट, 23 राज्यांना एकाही पैशाचं वाटप नाही

Jalgaon farmer Patil brothers earn fifty lakh rupees in Pomegranate farming with planning

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.