जनावरांची देखरेख आता पशुमंडळाकडे, कामधेनूच्या गावात वाढले दुधाचे उत्पादन

शेती या मुख्य व्यवसायाला इतर जोड व्यवसाय असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत नाही. त्याअनुशंगानेच दुग्धव्यवसाय हा वाढत आहे. मात्र, ज्या गावाला कामधेनू दत्तक म्हणून स्वीकारण्यात आले आहे. त्या गावातील दूध उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. या गावातील पशुसंवर्धनाची जबाबदारीच पशुसंवर्धन विभागाच्या पशुमंडळाने घेतली आहे. त्यामुळे येथे अनूलाग्र बदल दिसून येत आहे.

जनावरांची देखरेख आता पशुमंडळाकडे, कामधेनूच्या गावात वाढले दुधाचे उत्पादन
संग्रहीत छायचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 11:32 AM

गोंदिया : शेती या मुख्य व्यवसायाला इतर जोड व्यवसाय असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत नाही. त्याअनुशंगानेच (Milk Production Growth) दुग्धव्यवसाय हा वाढत आहे. मात्र, ज्या गावाला ( Kamdhenu Gram Adoption Scheme) कामधेनू दत्तक म्हणून स्वीकारण्यात आले आहे. त्या गावातील दूध उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. या गावातील पशुसंवर्धनाची जबाबदारीच पशुसंवर्धन विभागाच्या पशुमंडळाने घेतली आहे. त्यामुळे येथे अनूलाग्र बदल दिसून येत आहे. कामधेनू ग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या गावातील दुध उत्पादनात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली असून ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आता प्रत्येक गावात पशुमंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.

दूध उत्पादनात वाढ व्हावी तसेच पशुपालनाला तांत्रिक जोड देण्याची जबाबदारी ही पशूसंवर्धन विभागाकडे सोपिवण्यात आली आहे. या विभागातील पशुमंडळाने केलेल्या कार्यामुळेच गोंदिया जिल्ह्यातील ज्या गावांचा यामध्ये सहभाग आहे त्या गावातील दूध उत्पादनात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्या गावात 300 पैदास योग्य असणाऱ्या गावाची कामधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड केली जाते.

कशी केली जाते गावांची निवड?

कामधेनू दत्तक ग्राम योजना ही केवळ दूध उत्पादन वाढविण्याच्या अनुशंगाने राबवली जात आहे. यामध्ये निकष असा आहे की एका गावाची निवड ही एकदाच करता येते. शिवाय ज्या गावातील जनावरांची संख्या ही 300 आहे त्या गावाची निवड या योजनेत केली जात आहे. राज्यातील सर्व गावांचा सहभाग यामध्ये टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून पशू गणना केली जाते. यामध्ये सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाचा यामध्ये पशुसंवर्धन विभाग सहभाग करुन घेते.

पशुमंडळाकडे काय असते जबाबदारी?

पशुसंवर्धन विभागाकडून पशूंच्या देखभालीसाठी गावनिहाय पशुमंडाळाची स्थापन केली जाते. यामध्ये गावातील जनावरांचे लसीकरण, दुध उत्पादन वाढीसाठी प्रयोग, जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधे, गोचीडाचे व्यवस्थापन, संकरीत वासरांचा मेळावा, गोठा स्वच्छ करणे, वैरण विकासासाठी प्रयत्न या माध्यमातून जनावरांची देखभाल, आणि दुध उत्पादन वाढविणे हीच जबाबदारी या मंडळाची असते. आता ज्या गावाची निवड पशूसंवर्धन विभागाकडून केली जाणार आहे त्या गावातच पशुमंडळ हे मुक्कामी राहणार आहे.

गावाला 1 लाख 52 हजाराचा निधी

या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गावातील जनावरांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून याकरिता 1 लाख 52 हजार रुपये खर्ची केले जातात. यामध्ये जनावरांच्या देखभालीपासून ते औषध उपचाराचा खर्च असतो. मात्र, पशुमंडळाकडून गर्भधारणा, जंत नाशक औषधे, योग्य चाऱ्याचे नियोजन केले जात असल्याने दुध उत्पादनात वाढ होत आहे. दुध उत्पादनात वाढ हाच सरकारचाही उद्देश असून पशुसंवर्धन विभागाच्या अंमलबजावणीमुळे तो साध्य होत आहे.

गोंदिया जिल्ह्यात 20 टक्के दूध उत्पादनात वाढ

या योजनेत गोंदिया जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि पशुमंडळाकडून केली जात असलेली जनावरांची देखभाल यामुळे 20 टक्के दूध उत्पादनात वाढ झाली असल्याचे समोर आली आहे. कामधेनू गावातील पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्रशस्ती पत्रही दिले जाते.

संबंधित बातम्या :

Smart Farmers : ‘ई-पीक पाहणी’चा पहिला टप्पा यशस्वी आता ‘ई-पंचनामाचे’ अव्हान

कापूस विक्री करताय ? ही काळजी घ्या अन्यथा होईल फसवणूक ; काय आहे बाजार समित्यांचे अवाहन?

खुरकूताचा प्रादुर्भाव वाढला अन् लसीचा तुटवडा भासला, काय आहे उपाययोजना?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.