शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा “अकोले पॅटर्न”, लाभ कुणाला? प्लॅन काय? वाचा एका क्लिकवर
प्रख्यात शेतीतज्ज्ञ, 'ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, (OBC Indian Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे चेअरमन प्रा. काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता 'अकोले पॅटर्न' घेऊन आले आहेत.
मुंबई : आपण शेतकऱ्याला (Farmer) जगाचा अन्नदाता तर म्हणतो. मात्र एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरी इतर अडचणी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांना हादरे देणारा बहुजन महासंघाचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांचा ‘ अकोला पॅटर्न’ (Akola Pattern) एकेकाळी गाजला होता. त्यानंतर गेल्या 11 महिन्यात सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रख्यात शेतीतज्ज्ञ, ‘ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, (OBC Indian Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे चेअरमन प्रा. काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता ‘अकोले पॅटर्न’ घेऊन आले आहेत. बळीराजाला वाचवण्यासाठी रामबाण उपाय ठरणारा एक फॉर्म्युला ते उद्या बुधवारी 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर करणार आहेत. त्यासाठी दुपारी 3 वाजता ते मुंबई मराठी पत्रकार संघात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसहित मीडियाशी संवाद साधणार आहेत. गेल्या अनेक महिन्यातला शेतकरी आत्महत्येचा आकडा अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बळीराजाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी हा पॅटर्न आशादायी ठरणार आहे.
काळीज करपवणारा आत्महत्येचा आकडा
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेली आत्महत्या दुःखद आणि धक्कादायक असल्याने ती बातमी राष्ट्रीय होते, यावर आमचे दुमत नक्कीच नाही. पण राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक आणि कृषीप्रधान देशासाठी लांच्छनास्पद आहेत. हे आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी ओबीसी इंडियन चेंबर झटत आहे. आमच्या या प्रयत्नांना हातभार लावून सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्या चेंबरतर्फे प्रा. सुरेश जांभुळकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. गेल्या दोन वर्षात तर कोरोनामुळे अनेक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कारण सततच्या लॉकडाऊनचीही शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. आता कुठे कोरोनाचे आकडे कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.
शेतसारा भारण्याचीही ऐपत नाही
लहरी निसर्ग आणि दलालांची मर्जी, मनमानी यांच्या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे. लागवड खर्चात वाढ, उत्पादनात घट आणि शेतीमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा आणि बेभरवशाचा बनला आहे असे सांगतानाच विदर्भातील बड्या बड्या शेतकऱ्यांची शेतसारा भरण्याची सुद्धा ऐपत राहिलेली नाही, याकडे ओबीसी इंडियन चेंबरने लक्ष वेधले आहे. कधी कोरोना, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी अशा सतच्या संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच पाचवीला पुजलेला अवकाळी अनेकदा शेतकऱ्यांची हाततोंडाला आलेली पिकं घालतो, त्यामुळे या नव्या अकोले पॅटर्नकडून शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आहे.
परदेशी तेलबिया ‘जोजोबा’ची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, जाणून घ्या सर्वकाही
सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ