Agricultural Department: खरिपाचे नियोजन कागदावर नव्हे तर शेतीच्या बांधावर, कृषी विभागाच्या आराखड्यात दडलंय काय?

दरवर्षी कृषी विभागाकडून हंगामाचे नियोजन केले जाते. त्यानुसार हंगाामाबाबतचे निर्णय घेतले जातात. यंदा मात्र, स्थानिक पातळीवरची परस्थिती शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन खरीप हंगामाचे नियोजन केले जाणार आहे. गाव आणि शिवाराच्या गरजांवर आधारित ग्राम कृषी विकास आराखडे तयार केले जाणार आहेत. याच ग्राम कृषी आराखड्यावर आधारित तालुका आणि जिल्हा कृषी आराखडे तयार केले जाणार आहेत.

Agricultural Department: खरिपाचे नियोजन कागदावर नव्हे तर शेतीच्या बांधावर, कृषी विभागाच्या आराखड्यात दडलंय काय?
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:45 PM

लातूर : दरवर्षी (Agricultural Department) कृषी विभागाकडून हंगामाचे नियोजन केले जाते. त्यानुसार हंगाामाबाबतचे निर्णय घेतले जातात. यंदा मात्र, स्थानिक पातळीवरची परस्थिती शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन (Kharif Season) खरीप हंगामाचे नियोजन केले जाणार आहे. गाव आणि शिवाराच्या गरजांवर आधारित ग्राम कृषी विकास (Agri Policy) आराखडे तयार केले जाणार आहेत. याच ग्राम कृषी आराखड्यावर आधारित तालुका आणि जिल्हा कृषी आराखडे तयार केले जाणार आहेत. यासंबंधीच्या सूचना लातूर कृषी विभागाचे सहसंचालक एस.के. दिवेकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीही लक्षात येणार आहेत आणि शिवार पाहणीतून पीक पध्दतीही ठरवता येणार आहे.

गाव पातळीवरील नियोजनाचा असा हा फायदा

आतापर्यंत जिल्हा आणि राज्य स्तरावर हंगामाचे नियोजन केले जात होते. त्यामुळे सर्वकाही अंदाजेच ठरवले जात होते. कृषी विकासासाठी गाव घटक हाच महत्वाचा असल्याने यंदा हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गावात कृषी माल प्रक्रिया उद्योग उभारणी, कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांची माहिती, कृषी मित्र पुरस्काराचे मानकरी कोण, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, पीक स्पर्धा आदी उपक्रम राबवणे सोपे होणार आहे.

कृषी विभागाची भूमिका काय?

शेती करण्यापेक्षा त्यामधील नियोजन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना वेळेत पतपुरवठ्यासाठी आराखडा तयार करणे, पीकविमा योजना, फळपिक विमा अशा योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, लाभार्थी निवडीसाठीची ऑनलाईन प्रक्रिया शेतकऱ्यांना सांगणे, उत्पादन वाढीच्या प्रत्येक प्रक्रियेत कृषी विभागाचा पुढाकार वाढवणे असा अनेक बाबींचा यामध्ये समावेश राहणार आहे.

कृषी आराखड्यात नेमके असणार काय?

गावनिहाय हंगामातील पेरणी ते उत्पादन इथपर्यंतचा आढावा कृषी विभागाकडे राहणार आहे. यामध्ये पिकांखालील क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता याचा समावेश असणार आहे. मुख्य पिकांच्या बीजोत्पादनाचे कार्यक्रम, खताचा संतुलित वापर, 10 टक्के रसायनिक खत वापरुन खताची बचत कशी करावी याचे मार्गदर्शन राहणार आहे. उत्पादन वाढेल याच पध्दतीने पेरणी पध्दतीचे मार्गदर्शन एवढेच नाही तर विकेल ते पिकेल अभियनाच्या दृष्टीने नवीन पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ करुन मुल्यसाखळी विकसित केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : बाजारात विकेल तेच शेतामध्ये पिकेल, पांरपरिक पिकांना फाटा देत युवा शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग

Hapus Mango : फळांचा राजा ‘ऑनलाईन’द्वारेही मिळणार, रत्नागिरीत अनोख्या उपक्रमाला दणक्यात सुरवात

Milk : दर वाढले अन् उत्पादन घटले, वाढत्या उन्हात दूध उत्पादनवाढीसाठी काय काळजी घ्यावी ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.