ज्याची भीती होती तेच झाले, उभ्या सोयाबीनलाच कोंब फुटले

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 221 मिलीमिटर जास्तीचा पाऊस हा आताच झालेला आहे. एक दिवसही पाऊस उसंत घेत नसल्याने शेती कामे तर सोडाच शेतकऱ्यांना मार्गस्थ होणेही मुश्किल होत आहे. आजही सोयाबीनचे पीक हे वावरात उभे असून अधिकच्या पावसामुळे (soyabean explodes) सोयाबीनला चक्क कोंब फुटलेले आहेत.

ज्याची भीती होती तेच झाले, उभ्या सोयाबीनलाच कोंब फुटले
पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची झालेली अवस्था
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 9:54 AM

हिंगोली : मराठवाड्यात पावसाचा हा कायम आहे. (Marathwada) वार्षिक सरासरीच्या तुलनेत 221 मिलीमिटर जास्तीचा पाऊस हा आताच झालेला आहे. एक दिवसही पाऊस उसंत घेत नसल्याने शेती कामे तर सोडाच शेतकऱ्यांना मार्गस्थ होणेही मुश्किल होत आहे. आजही सोयाबीनचे पीक हे वावरात उभे असून अधिकच्या पावसामुळे (soyabean explodes) सोयाबीनला चक्क कोंब फुटलेले आहेत. त्यामुळे पीकाच्या काढणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे खरिपातील उर्वरीत पीकांची काढणी होणार की मोडणी ही अवस्था झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेला पाऊस ऑगस्टच्या अखेरपर्यंत कायम आहे. त्यामुळे काढणी कामे ही रखडलेली असून उत्पादनाबाबतच्या आशा आता मावळलेल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. तब्बल 14 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान हे झाले आहे. राज्यात सोयाबीनची पेरणी ही 53 लाख हेक्टरावर झालेली होती. नगदी पीक म्हणून शेकऱ्यांचा कल हा सोयाबीनकडेच असतो.

यंदा मात्र, पावसाच्या अवकृपेमुळे उत्पादन तर नाहीच परंतु, पेरणी आणि जोपासण्यासाठी केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. पावसाचा कायम मारा असल्याने हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उभ्या पीकालाच आता कोंब फुटु लागले आहेत. शिवाय शेतामध्ये पाणी साचलेले असून अद्यापही पावसाचा जोर हा वाढत आहे. मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी ही 671. 6 मिलीमीट आहे.

आतापर्यंत 894. 8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. शिवाय परतीच्या पावसाचे आगमन अजून झाले नसल्याने भविष्यात शेतकऱ्यांसमोर काय समस्या उभ्या राहणार आहेत याची कल्पनाच न केलेली बरी. चार दिवसापासून परभणी जिल्ह्यात पावसाचे थैमान आहे तर उस्मानाबादमध्ये तर पुरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. एकंदरीत खरीप हंगाम हातचा गेला असून या पिकांची काढणी करायची कशी असा सवाल आहे.

पंचनामे झाले, उर्वरीत क्षेत्रावरील नुकसानीचे काय ?

मराठवाड्यातील हिंगोली, उस्माबाद आणि लातूर जिल्ह्यातील पीकाचे पंचनामे हे पूर्ण झाले असल्याचे सांगितले आहे. मात्र, पुढे पंचनामे झाले की मागे पावसानी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील पंचनामे होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह आहे. शुक्रवारी रात्री उस्मानाबद जिल्ह्यातील भूम, वाशी, परंडा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून पुन्हा पंचनामे करावेत अन्यथा सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सोयाबीन बनीम गेल्या वाहून

मांजरा धरण हे 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शिवाय काढणी झालेल्या सोयाबीनच्या बनीम शेतकऱ्यांनी लावून ठेवलेल्या आहेत. मात्र, शुक्रवारी पालसाचा जोर वाढला आणि धरणातून अधिकच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धनेगाव परीसरातील सोयाबीनच्या बनीमच वाहून गेल्या आहेत. अतिरीक्त पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कापूसही आडवा झाला

पावसामुळे शेतशिवारात पाणी साचलेले आहे. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होतच आहे पण शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून जात आहेत. अधिकच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेवडी- माणकेश्वर येथील उभा कापूस हा आडवा झाला आहे. त्यामुळे खरीपातील उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. (Kharif season’s standing soyabean explodes, farmers in Marathwada suffer)

संबंधित बातम्या :

व्यथा शेतकऱ्याची : दोन एकरामध्ये दीड लाखाचा खर्च अन् पपईला दर 4 रुपये किलो

उडीदाबरोबर सोयाबीनचेही दर स्थिर, लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली

महाराष्ट्र – बिहार दरम्यान किसान रेल्वेची सेवा ; शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान

बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.