Parbhani : राज्य सरकारकडून मराठवाड्यातील योजनांना ‘ब्रेक’, कृषी महोत्सवातही ‘राजकारण’

हाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विकास कामांना तर खीळ बसलेलीच आहे पण ज्या योजना राबवल्या जात होत्या त्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे सरकार स्थगितीचे सरकार असून आतापर्यंत मराठवाडा विकास महामंडळ योजना बंद केली , जलयुक्त शिवार योजना बंद केली, मराठवाडा वॉटरग्रेड योजना बंद केली यामुळे राज्याचे मोठे नुकासन झाल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

Parbhani : राज्य सरकारकडून मराठवाड्यातील योजनांना 'ब्रेक', कृषी महोत्सवातही 'राजकारण'
परभणी येथे कृषि महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रांची माहिती मिळणार आहे.उद्घाटन प्रसंगी डॉ. भागवत कराड, बबनराव लोणीकर हे उपस्थित होते.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 4:49 PM

परभणी : कार्यक्रम धार्मिक असो की सांस्कृतिक त्याला राजकीय किनार असल्याशिवाय तो पूर्णच होत नाही. आता (Parbhani) परभणी येथे कृषी (Agricultural Festival) संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेती विषयी माहिती आणि (State-of-the-art technology) अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे क्रमप्राप्त असताना या महोत्सावाच्या उद्गाघटन प्रसंगी उपस्थितांनी राजकीय मतभेद करण्यातच धन्यता मानली. राज्य सरकारने मराठवाड्यातील अनेक योजना बंद पाडल्या त्यामुळे या भागातील विकास खुंटला असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले. मात्र, परभणीत होऊ घालत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या महोत्सवात शेती यंत्र तसेच विविध साहित्यांची रेलचेल होती. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही इतर शेतकऱ्यांना मिळाली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराडांच्या हस्ते उद्घाटन

परभणी येथे आयोजित केलेल्या कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्याने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. महोत्सावाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी लावलेले स्टॉल हेच आकर्षणाचे केंद्रबिंदू होता. या स्टॉलमुळे वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर विविध यंत्र सामुग्रीही पाहवयास मिळाली. काही शेतकऱ्यांनी उपयोगी साहित्याची खरेदी केली होती. यावेळी बबनराव लोणीकर, आनंद भरोसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील योजना बंद, विभागाचे न भरुन निघणारे नुकसान

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विकास कामांना तर खीळ बसलेलीच आहे पण ज्या योजना राबवल्या जात होत्या त्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे सरकार स्थगितीचे सरकार असून आतापर्यंत मराठवाडा विकास महामंडळ योजना बंद केली , जलयुक्त शिवार योजना बंद केली, मराठवाडा वॉटरग्रेड योजना बंद केली यामुळे राज्याचे मोठे नुकासन झाल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.एवढेच नाही तर कृषी महोत्सावात इंधन दरवाढीचा विषय चर्चेला गेला. याकरिताही राज्य सरकारच जबाबदार असल्याचे कराड यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी कृषी क्षेत्राच्या व्यासपीठाहूनही राजकीय स्वार्थच साधल्याने शेतकऱ्यांना जे अपेक्षित होते ते मिळाले नाही.

हे सुद्धा वाचा

राज्य अंधारात, विकासही खुंटला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास योजनांना खीळ बसली आहे तर ज्या योजनांचे काम सुरु होते ते बंद करण्याचे पापही याच सरकारने केले आहे. केवळ नियोजनाअभावी राज्यात विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. वीज,पाणी नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा घणाघात लोणीकर यांनी केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.