सोयाबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, शेतकऱ्यांच्या मनात नेमंक आहे तरी काय?
खरीप हंगामातील पिकांच्या दराला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात यंदा कायम संभ्रम राहिलेला आहे. यापूर्वी सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्यामुळेच दर वाढ होऊनही बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही वाढलेली नव्हती. कापसाच्या बाबतीत मात्र, अंतिम टप्प्यात हे चित्र पाहवयास मिळत आहे.
औरंगाबाद : खरीप हंगामातील पिकांच्या दराला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात यंदा कायम संभ्रम राहिलेला आहे. यापूर्वी (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्यामुळेच दर वाढ होऊनही बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही वाढलेली नव्हती. (Cotton) कापसाच्या बाबतीत मात्र, अंतिम टप्प्यात हे चित्र पाहवयास मिळत आहे. कापूस विक्रीला सुरवात होताच दर हे 8 हजारापेक्षा अधिक होते. मात्र, आता उत्पादनात घट आणि वाढती मागणी यामुळे भविष्यात कापसाचे दर वाढतील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे मराठवाड्यातील (Cotton arrivals fall) कापूस खरेदी केंद्रावर कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. अपेक्षित दर मिळाल्याशिवाय कापसाची विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला अच्छे दिन
यंदा सबंध राज्यात कापसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती तर सोयाबीनचे क्षेत्र हे वाढले होते. यातच पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. असे असताना जागतिक बाजारपेठेतही कापड उद्योगासाठी कापसाची मागणी वाढू लागल्याने हंगामाच्या सुरवातीला 10 हजार रुपये क्विटंलचा दर मिळाला होता. मात्र, आता कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असताना शेतकरी तोडणी झालेला कापूस थेट व्यापाऱ्यांकडे न नेता त्याची साठवणूक करु लागला आहे. सध्या कापसाला 8 हजार रुपये क्विटंलचा दर सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती 10 हजार रुपये दराची त्यामुळे आता साठवणूकीवर भर दिला जात आहे.
सोयाबीनप्रमाणेच कापसाची अवस्था
सोयाबीनचे दर तर हंगामाच्या सुरवातीपासूनच घसरलेले होते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी घसरलेल्या दरात सोयाबीनची विक्रीच केली नाही. सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. त्याचा परिणाम म्हणून 4 हजार 500 वरील सोयाबीन गतआठवड्यापर्यंत 6 हजार 200 आले होते. दर वाढूनही शेतकऱ्यांनी अधिकच्या अपेक्षेने साठवणूकीवरच भर दिला होता. मात्र आता सोयाबीनचे दर घटू लागले आहेत तर आवक वाढत आहे. वाढीव दराच्या अपेक्षेत कापसाचीही अशीच परस्थितान होऊ नये म्हणजे झाले.
कापसाला 8 हजाराचा दर शेतकऱ्यांना अपेक्षा 10 हजाराची
यंदा उत्पादनावर अधिकचा खर्च झाला असूनही पावसामुळे अपेक्षित पीक शेतकऱ्याच्या पदरी पडलेले नाही. त्यामुळे शेतीमालाला योग्य दर मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मध्यंतरी कापसाची आवक वाढल्याने लागलीच दराच घसरण झाली आहे. 10 हजार रुपये क्विंटलवरील कापूस थेट 8 हजारावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर वाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पाचोड बाजारात कापसाची आवक ही घटलेली आहे.