प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन वर्षात किती पैसे मिळाले?
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत दोन वर्षात महाराष्ट्रातील 102.54 लाख लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय. Maharashtra farmers PM Kisan Samman Scheme
मुंबई: केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सात हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील 102.54 लाख लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झालीय. (Maharashtra Economic Survey said farmers get nine thousand crore rupees under PM Kisan Samman Scheme).
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रक्कम?
केंद्र सरकारनं देशातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाना 2000 रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. 2018-19 मध्ये ही योजना सुरु झाल्यापासून 4 जानेवारी 2021 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 हजार 496.38 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्याच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला पहिला पुरस्कार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना वेगवेगळया श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालाय. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 24 फेब्रुवारी 2021 रोजी 2 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य आणि निवडक जिल्ह्यांना येथील पुसा कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री, कृषी विभागाचे सचिव आणि कृषी आयुक्त यांच्यासह, पुणे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला हजर राहतील.
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पहिला क्रमांक पटकावलाhttps://t.co/iQzZ4jbLxm#ThackerayGovernment #PMKisanSammanScheme #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021
संबंधित बातम्या:
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पहिला क्रमांक पटकावला
(Maharashtra Economic Survey said farmers get nine thousand crore rupees under PM Kisan Samman Scheme).