खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग; जाणून घ्या बियाणे, खत कधी मिळणार ? राज्य सरकारने दिली माहिती

यावर्षी येत्या 30 मे रोजी बियाणांची विक्री होणार होती. मात्र, 25 मे पासून बियाणे आणि खतांची विक्री केली जाणार आहे. (seed and fertilizer farmers)

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग; जाणून घ्या बियाणे, खत कधी मिळणार ? राज्य सरकारने दिली माहिती
seeds and farmer
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:55 PM

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरु झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरु केली आहे. शेतकरी बियाणे, खते ( seed and fertilizer) यांची जोजवणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी मुदतीच्या पाच दिवस आधीच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते मिळणार आहेत. यावर्षी येत्या 30 मे रोजी बियाणांची विक्री होणार होती. मात्र, आता हीच विक्री पाच दिवस आधी म्हणजेच 25 मे पासून सुरु होणार आहे. कोरोना, मराठा आरक्षण तसेच इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारची आज (12 मे) बैठक बोलावण्यात आली होती. याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत सविस्तर  माहिती दिली. (Maharashtra government decided to provide seed and fertilizer to farmers on 25 may for sowing)

राज्य सरकारचा नवा निर्णय काय आहे ?

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी खरीप हंगामाबद्दल चर्चा करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामात लागवड करण्यासाठीची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली असून त्यासाठी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे पुरवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. त्यामुळे सध्याचा कोरोनाकाळ पाहता शेतकऱ्यांना यंदा 5 दिवस आधीच बियाणे खत देण्याचे राज्याने ठरवले. मागील निर्णयानुसार बियाणांची विक्री येत्या 30 मे रोजी सुरू होणार होती. मात्र, आता शेतकऱ्यांना पाच दिवस आधीच म्हणजेच 25 मे पासून बियाणे मिळणार आहेत.

पुरेशा पावसानंतर पेरणी करा

मागील काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करुन पावसाने कित्येक दिवस दडी मारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याच कारणामुळे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे या वर्षी बियाणे लवकर खरेदी केले तरी पुरेशा पावसानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाविषयक निर्बंध असल्यामुळे कृषीविषयक दुकाने उघडण्यासाठी काही निर्बंध आहेत. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन राज्य सरकारने राज्यातील कृषी दुकाने 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील असे सांगितले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी योग्य वेळ मिळेल असे सांगितले जात आहे.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 600 मीटर अंतरावरील कृषी पंपांना जोडणीला प्राधान्य देणार, नितीन राऊत यांची घोषणा

पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना कसा मिळतो लाभ व अनुदानबाबत काय आहेत नियम?

चांगल्या कमाईसाठी मशरुमपासून बनवा पापड, चिप्स आणि लोणचे, दीर्घकाळ टिकतील हे पदार्थ

(Maharashtra government decided to provide seed and fertilizer to farmers on 25 may for sowing)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.