Monsoon Rain : 6 जूनला मान्सून राज्यात धडक देणार! येत्या 24 तासांत मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता
Maharashtra Monsoon Rain Update : मान्सूनने सध्या अरबी समुद्राता मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आमि कर्नाटकच्या काही भाग व्यापलाय. दक्षिणसह बंगालच्या उपसागरातून मान्सून आता वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास करतोय.
मुंबई : लांबणीवर पडण्याची शक्यता असतानाचा आता पुन्हा एकदा मान्सूनचं (Monsoon Rain Update) वेग पकजला आहे. 6 ते 10 जून दरम्यान मान्सूनच महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Rain Latest Update) धडक देण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान (IMD) विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 जून ते 10 जून या चार दिवसांच्या दरम्यान, कोणत्याही क्षणी मान्सूनच्या आनंदसरी बरसतली, असं सांगण्यात आलंय. मान्सूनने रविवारी केरळमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. दरम्यान, आता मान्सूनचा महाराष्ट्रासाठीचा प्रवास वेगानं होत असून जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर येत्या 24 तासांत राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विजांच्या कडकडासह…
येत्या 24 तासांत मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो, असा अंदाज हवमान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, 2 ते 3 जून रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसंच मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिलं, असं सांगितलं जातंय.
..तरच 6 जूनला महाराष्ट्रात आगमन
मान्सूनने सध्या अरबी समुद्राता मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आमि कर्नाटकच्या काही भाग व्यापलाय. दक्षिणसह बंगालच्या उपसागरातून मान्सून आता वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास करतोय. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून केरळचा उर्वरीत भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. हा प्रवास जर वेगानं झाला तर 6 जून मान्सून महाराष्ट्रात धडक देईल, असं सांगितलं जातंय.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, गेल्या 24 तासांत गोव्यासह कोकणातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्यात. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं असल्याचं पाहायला मिळालयं. आता येत्या दोन दिवसांत गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.