Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचला

महाराष्ट्रातील लासलगावात कांद्यांचा दर प्रति क्विंटलला 4500 रुपये इतका मिळाला आहे. Onion prices Lasalgaon APMC

Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचला
लासलगावात कांद्याला 4500 रुपये क्विंटला दर मिळाला
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 2:39 PM

नाशिक: गेल्या काही दिवासांपासून कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रात कांद्यांचा दर प्रति किलो 45 रुपयांवर पोहोचला आहे. एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लासलगावातील बाजारपेठेत कांद्याची विक्री 4500 रुपयांना एक क्विंटल अशी झाली. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनला बसल्यानं कांद्याचे दर वाडत आहेत. नाशिकमधील व्यापाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसर कांद्याचा आजचा दर 3000 ते 4500 रुपयांच्या दरम्यान राहिला. येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शकत्या वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Onion prices reach Rs 4500 per quintal in Nashik’s Lasalgaon APMC)

किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपयांना विक्री

नाशिकच्या लासलगावात कांद्याचा दर 45 रुपयांवर पोहोचला तर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलोनं विक्री केली जात आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी हटवल्यानंतर कांद्याचे दर वाढल्याचं दिसून आलं होते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सुरु असलेला अवकाळी पाऊस देखील कांदा दरवाढीला कारणीभूत आहे. बंगाल, राजस्थान आणि गुजरातमधील कांदा बाजारपेठेत आला नसल्यानं येत्या काही दिवसांपर्यंत दर वाढलेले राहण्याची शक्यता आहे.

लासलगावात ठरतो कांद्याचा दर

संपूर्ण देशभरातील कांद्याचे दर ठरवण्यात नाशिकमधील लासलगाव बाजार समितीची महत्वाची भूमिका आहे. लासलगाव बाजारसमिती कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती आहे. महाराष्ट्राच्या एकूण कांदा उत्पादनांपैकी 60 टक्के कांदा नाशिक जिल्ह्यात पिकवला जातो. महाराष्ट्रातून भारतातील बऱ्याच भागाला कांदा पुरवला जातो. लासलगावात कांद्याच्या ठोक दरात वाढ झाली की देशातील कांद्याचे दर वाढतात.

किरकोळ बाजारात कांदा पन्नाशीच्या वर

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये जवळपास 23400 गोणी कांद्याची आवक झाली आहे. तर मागील आठवड्यापेक्षा कांद्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा 40 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये दराने विकला जात आहे.

नवीन कांदा पूर्ण क्षमतेने सुरु होई पर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार

नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली असून पूर्ण क्षमतेने कांदा सुरु होईपर्यंत कांद्याचे दर चढे राहणार आहेत. कांदा व्यापारी सुरेश शिंदे यांनी ही माहिती दिली होती.

अवकाळी अतिवृष्टीमुळे पुणे आणि नाशिक परिसरातील कांदा शेतकरी चिंतेत

राज्यातील नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतलं जातं. पण, सप्टेंबर आक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं. पुणे आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर, या परिसरात थंडी वाढल्याने कांदा पिके चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?

(Maharashtra Onion prices reach Rs 4500 per quintal in Nashik’s Lasalgaon APMC)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.