AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Factory : महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांची धुराडी बंद तरीही साखर उत्पादनात राज्य अव्वल स्थानी..!

गेल्या 5 महिन्यांपासून गाळप हंगाम सुरु असून संपूर्ण देशामध्ये 15 मार्चपर्यंत 283 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीपेक्षा यामध्ये 23 लाख टन अतिरिक्त उत्पादन झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. यंदा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही देशातील 435 साखर कारखान्यांकडून सध्याही गाळप हे सुरुच आहे. महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला असला तरी देशातील एकूण उत्पादनापैकी 108 लाख टन साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झाले आहे.

Sugar Factory : महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांची धुराडी बंद तरीही साखर उत्पादनात राज्य अव्वल स्थानी..!
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 12:13 PM

पुणे : (Sugarcane Area) ऊसाचे वाढते क्षेत्र, वाढते उत्पादन याच बरोबर राज्यात अतिरिक्त ऊसाचाही प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. महाराष्ट्र सध्या सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. गेल्या 5 महिन्यांपासून (Sludge Season) गाळप हंगाम सुरु असून संपूर्ण देशामध्ये 15 मार्चपर्यंत 283 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीपेक्षा यामध्ये 23 लाख टन अतिरिक्त उत्पादन झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. यंदा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही देशातील 435  (Sugar Factory) साखर कारखान्यांकडून सध्याही गाळप हे सुरुच आहे. महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला असला तरी देशातील एकूण उत्पादनापैकी 108 लाख टन साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रात यंदा गाळपाचा कालावधीच वाढला नाही तर साखरेचे उत्पादनही वाढले आहे. एवडे सर्व होऊनही अजून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.

महाराष्ट्राची आघाडी कायम

देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन अधिक होते. यंदा ऑक्टोंबर महिन्यापासून गाळप हंगामास सुरवात झाली होती. हंगामाच्या सुरवातीपासूनच साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही ही आघाडी कायम आहे. गतवर्षी मार्च महिन्यात राज्यात 94 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ऊसाच्या क्षेत्रात वाढ तर झालीच पण अधिकचा उतारा पडत असल्याने उत्पादन वाढले आहे. सध्या राज्यात 184 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप सुरु आहे. आगामी आठ दिवसांमध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण बंद होतील असा अंदाज आहे.

अतिरिक्त ऊसामुळे हंगाम लांबणार

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होऊ लागले असले तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. सध्या सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तर याच विभागातील 13 साखर कारखान्यांची धुराडीही बंद झाली आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर भारतामध्ये ऊस अजूनही फडातच आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाने सुरुच ठेवण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिले आहेत. त्यामुळे काही भागातील हंगाम लांबणार असे चित्र आहे.

देशात 283 लाख टन साखर तयार

देशात जवळपास 516 साखर कारखान्याच्या माध्यमातून मार्चपर्यंत 283 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा ऊसासाठी वातावरण पोषक राहिल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे. गतवर्षी याच महिन्यामध्ये 259 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. पण वाढत्या क्षेत्राबरोबरच चांगला उताराही मिळालेला आहे. यामध्ये महाराष्ट्राची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. एकट्या महाराष्ट्रात मार्चपर्यंत 108 लाख टन साखरेची निर्मिती झालेली आहे.

संबंधित बातम्या :

Nanded : नांदेडमधील लाखो हेक्टरावरील वनराई उजाड त्यात वनक्षेत्रातच शेती व्यवसाय

Cotton : कापसाचेच नव्हं यंदा तर फरदडचेही सोनं, अंतिम टप्प्यातही Market ‘भारीच’

PM मोदींनी Zero Budget शेतीचे फायदे सांगितले, अलिबागच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, अडीच गुंठ्यात अस्सल मिरचीचा ‘ठसका’

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.