आमच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 18 हजार रुपये द्या, ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक प्रचारातील आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. Mamata Banerjee Narendra Modi

आमच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 18 हजार रुपये द्या, ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र
ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 5:21 PM

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक प्रचारातील आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पीएम किसान योजनेची रक्कम प्रती शेतकरी 18 हजार देण्याची मागणी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. (Mamata Banerjee wrote letter to PM Narendra Modi demanding centre give 18 thousands rupees to farmers of west Bengal under pm kisan scheme)

शेतकऱ्यांसाठी निधी वर्ग करा

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना यासबंधी पत्र लिहिले आहे. अलीकडच्या काळात तुम्ही पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आला होतात, त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना 18 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्यापपर्यंत पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारला कोणताही निधी मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा निधी राज्य सरकारकडे वर्ग करा, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये पीएम किसान योजनेला मंजुरी?

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रावरुन पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीए किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जीचं पत्र म्हणजे एक प्रकारे पश्चिम बंगालमध्ये पीएम किसान सम्मान योजनेला परवानगी मिळाली, असं म्हणावं लागेल. पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना आता पहिल्यांदा किसान सम्मान योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जींचं पत्र

ममता बॅनर्जी यांनी पीएम किसान योजनेचा लाभ पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी यापूर्वीच केल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. 31 डिसेंबर 2020 ला केंद्रीय कृषी मंत्रालयाला पत्र लिहल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं अनेकदा पीएम किसान योजनेसंबंधी केंद्रीय कृषी मंत्रालयाला संपर्क केला पण योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी म्हटलय.

पश्चिम बंगालच्या 10 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार

केंद्रीय कृषी मंत्रालयानं पाठवलेल्या एका पत्राचा ममता बॅनर्जी यांनी संदर्भ दिला आहे. या पत्राद्वारे पश्चिम बंगालच्या 21.79 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती मिळाली होती. यामधील 14 लाख 91 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. यापैकी 9.84 लाख शेतकऱ्यांचा डाटा पीएफएमएससाठी तयार असल्याची माहिती त्यांन दिली.

संबंधित बातम्या : 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मालमत्ता किती? जाणून घ्या…

बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

(Mamata Banerjee wrote letter to PM Narendra Modi demanding centre give 18 thousands rupees to farmers of west Bengal under pm kisan scheme)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.